गणपती विसर्जनाला गेले, पण माघारी परतलेच नाही…नेमकं काय घडलं?

गणपती विसर्जनाला गेले, पण माघारी परतलेच नाही…नेमकं काय घडलं?

Nashik Ganesh Visarjan : राज्यभरात गणरायाला निरोप देण्याासाठी उत्साहाचं वातावरण आहे. मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भात ढोल-ताशाच्या गजरात निरोप दिला जात आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतानाच नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. गणरायाच्या मुर्तीचं विसर्जन करण्यासाठी गेलेल्या नाशिकचे चार जण पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे.

भाजी मंडईनंतर आता राहुल गांधी फर्निचर मार्केटमध्ये; म्हणाले, थोडं शिकण्याचाही प्रयत्न केला…

नाशिकमधील गोदावरी नदीत दोघे तर वालदेवी धरणात दोन जण बुडाले आहेत. गोदावरी नदीच्या घाटावर गणेशमुर्तीचं विसर्जन सुरु होतं. गोदाघाटावर अनेक भाविक लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी जमले होते. त्याचवेळी दोन तरुण गणरायाचं विसर्जन करण्यासाठी पाण्यात उतरले होते. या दोन तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले आहेत. प्रशासनाकडून या दोघांचा शोध घेण्यात येत आहे.

धक्कादायक! देशात 18 कोटी 80 लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण; WHO कडून आकडेवारी जाहीर

तर दुसरीकडे वालदेवी धरणाच्याच्या पाण्यातही गणपती विसर्जन उत्साहात सुरु होतं. गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी आलेल्यांपैकी दोन तरुण धरणाच्या पाण्यात उतरले होते. दोघेही तरुण पाण्यात उतरले खरे पण पुन्हा परतलेच नसल्याने संध्याकाळच्या सुमारास दोन्ही तरुणांचे मृतहेद आढळून आले आहेत.

Dipendra Singh Airee : ९ चेंडूत अर्धशतक करून युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडला, नेपाळचा २३ वर्षीय दीपेंद्र सिंह ऐरी आहे तरी कोण?

दरम्यान, राज्यात दरवर्षी विविध ठिकाणी गणपती विसर्जनाच्या दिवशी अशा घटना घडल्याचं समोर आलं आहे. अशा घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात, मात्र, प्रशासनाच्या नियमांच उल्लंघन करीत तरुण पाण्यात उतरुन जीव धोक्यात घालत असल्याचं अनेकदा निदर्शनास आलं आहे.

प्रशासन सतर्क तरीही…
राज्यात गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गृह खात्याकडून खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्हापातळीवर जिल्हा प्रशासनाकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलिस कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्यांना तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. यासोबतच गणपती विसर्जनाच्या ठिकाणांसह विसर्जन मिरवणुकांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. तरीही अशा घटना घडत असल्याचं समोर येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube