महाविकास आघाडी म्हणजे ना घरका, ना घाटका; पटेलांची एकाच वाक्यात व्याख्या..
Praful Patel on MVA : महाराष्ट्रात आज काँग्रेससह शरद पवार गट व उद्धव ठाकरे गटाची अवस्था म्हणजे ना घर का ना घाटका अशी झाली आहे. ठाकरेंसह राष्ट्रवादीला आपली भूमिका काय हेच माहीत नाही किंवा काय भूमिका घ्यावी हे देखील माहीती नाही असा खोचक टोला अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी लगावला. शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या नवसंकल्प शिबिरात पटेल बोलत होते. यावेळी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पटेल पुढे म्हणाले, पक्षात २०२३ ला जी घडामोड घडली तसेच लोकसभेनंतर असलेला काळ व पक्षातील उदासी याला तोंड कसे देणार असा प्रश्न मनात होता. लोकसभेत पराजय झाला मात्र विधानसभेत मोठा विजय आपण मिळवला. बारामतीचा निकाल अजितदादांसाठी धक्कादायक होता. महाराष्ट्राने आपल्याला नाकारले की काय असा मनात प्रश्न निर्माण झाला होता. शिंदे फडणवीसांशी चर्चा केली व त्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये मोठ्या संख्येने विजयाचा गुलाल उधळला.
एकतरी आरोप सिद्ध करा, कराडशी आर्थिक संबंधांचा आरोपही खोटा; धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
पुरोगामी विचारधारा पक्षाची आहे. तुम्ही तुमच्या विचारावर ठाम रहा असा सल्ला मोदींनी आम्हाला दिला होता. कलम ३७० हे काही कोणा विशिष्ट समाजासाठी केलेलं नव्हतं. जम्मू काश्मीरमध्ये हिंदू-मुस्लिम वाद नाही त्यावेळेचा काश्मीर व आजचा काश्मीर वेगळा आहे.
काँग्रेसने पहिल्यांदा आपला इतिहास पाहावा त्यानंतर दुसऱ्यावर बोललं पाहिजे. महाराष्ट्रात आज काँग्रेससह शरद पवार गट व उद्धव ठाकरे गटाची अवस्था म्हणजे ना घर का ना घाटका अशी झाली आहे. ठाकरेंसह राष्ट्रवादीला आपली भूमिका काय हेच माहीत नाही किंवा काय भूमिका घ्यावी हे देखील माहीती नाही. काँग्रेसच्या लोकांचे आकर्षण आजही अजित पवार गटाकडे आहे. शिबीर अधिवेशनात टाळ्या फोटो काढण्यासाठी येतात पण पक्षासाठी तुम्ही काय काम केलं हे आधी पाहा
शरद पवारांना मोठा धक्का! बडा नेत्याचा लवकरच अजित पवार गटात प्रवेश; कारण काय?