निवडणुकीतील पराभव त्यांना पचवता येईना…; समर्थकावरील हल्ल्यानंतर लंके संतापले
Nilesh Lanke On Sujay Vikhe : नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या निलेश लंकेंनी Nilesh Lanke) भाजपचे सुजय विखेंचा (Sujay Vikhe) 28 हजार 929 मतांनी पराभव केला. निकालानंतर आता विखे विरुद्ध लंके संघर्ष समोर येऊ लागला आहे. अशाचत लंके यांच्या समर्थकावर जीवघेणा हल्ला झाला. त्यामुळं निलेश लंके आक्रमक झालेत. त्यांनी नाव न घेता सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणुकीत पराभव जरी झाला तरी तो आनंदाने पचवता आला पाहिजे. मात्र काहींनी पराभवच मान्य नाही, अशी टीका त्यांनी केली.
राहुल गांधींना धक्का! ‘आप’ने सोडला काँग्रेसचा हात, केली मोठी घोषणा
लोकसभा निवडणुकीनंतर दक्षिणेमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. लंके यांचा बालेकिल्ला असलेल्या पारनेरमध्ये सुजय विखे आणि निलेश लंके यांचे समर्थक एकमेकांमध्ये भिडले. यावेळी लंके यांचे समर्थक असलेले राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. निवडणुकीतील निकालानंतर या घटनेने पारनेर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. झावरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी नगर शहरातील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यांतर निलेश लंकेंनी झावरे यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
मुंज्यामध्ये शर्वरीचं ‘बाहुबली’ कनेक्ट! म्हणाली हा एक रोमांचक अनुभव
यावेळी बोलताना निलेश लंके म्हणाले की, निवडणूक म्हटलं की, हार-जित होतच असते. निवडणुकीत पराभव झाला तरी तो आनंदाने पचवता आला पाहिजे. मात्र काही लोकांना पराभवच मान्य नसतो. त्यामुळे अशा घटना घडत आहे. हल्ला करणाऱ्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे देखील यावेळी बोलताना लंके म्हणाले.
गुंड प्रवृत्तीचा बिमोड झाला पाहिजे
या घटनेनंतर आमचे सहकारी हे पोलीस अधीक्षकांना भेटणार असून या प्रकरणातील आरोपींवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमची असणार आहे. या घटनेला मला राजकीय रंग द्यायचा नाही. कारण निवडणुकीतील विजयानंतर मी कुठल्याही पक्षाच्या किंवा नेत्यांवरती टीका टिपणी किंवा भाष्य केले नाही. मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही. मात्र पारनेर असो वा नगर अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा बिमोड झाला पाहिजे. तसेच या घटनेला काही राजकीय कारण असू शकते, असंही लंके म्हणाले.