शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे व सदाशिव लोखंडे यांच्यात लढत असली तरी खरा सामना राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात असाच आहे.
नाशिक आणि दिंडोरीमध्ये काही ठिकाणी कमी मतदान झालं. त्यामुळे गिरीश महाजनांनी बूथनिहाय अहवाल मागवला आहे.
नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीपात्रात एसडीआरएफची बोट उलटली. या दुर्घटनेत तिघा जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
अहमदनगर शहरातील दोन गुंतवणूकदारांना शेअर मार्केटच्या नावाखाली 76 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.
अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये उभारण्यात आलेल्या अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई होणार आहे. मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी तसा इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरेंना अनेक आजार झाले आहेत. ते चिडलेले आणि घाबरलेले आहेत. त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे.