Shirdi News : नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा मंदिरासंदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. येथील साईबाबा मंदिरात दर्शन पास असेल तरच भाविकांना प्रवेश द्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. शिर्डीत (Shirdi) रोज देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आता हे स्पष्ट झाले आहे […]
Maratha Reservation : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation ) लढा सुरु आहे. त्यामध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने त्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. आरक्षणाबाबतच्या नेतेमंडळींच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे आमदार प्रजक्त तनपुरे यांनी संताप व्यक्त केला. प्रस्ताव सुरु अन नेतेमंडळी जेवणात व्यस्त… आरक्षणाच्या मागणीला राज्यातील नेतेमंडळी जरी समर्थन देत आहेत तरी याप्रश्नी नेतेमंडळी गंभीर नसल्याची […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) के.के.रेंज परिसरात लष्कराकडून युध्द सराव सुरू केल्यानंतर पारनेर तालुक्याच्या अनेक गावांमध्ये भुकंपसदृश धक्के बसल्याने पारनेरकरांच्या हृदयाचा ठोका चुकला. दारे खिडक्या वाजू लागल्याने अनेक नागरीक घराबाहेर येऊन उभे राहिले. बुधवारी रात्री 9 वाजून 50 मिनिटे ते 10 वाजण्याच्या दरम्यान हे धक्के जाणवले. अचानक धक्के सुरू झाल्याने गांगरून गेलेले अनेक […]
Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील दोन गटात अध्यक्ष पदावरून हाणामारी होऊन सात जण जखमी झाले आहेत. या हाणामारीत जखमी झालेले मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड (Sanjay Markad) यांनी हा हल्ला भाजपच्या आमदार मोनिका राजळे (Monica Rajale) यांच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर केला आहे. त्यामुळे आता या […]
अहमदनगरः अण्णा हजारे (Anna Hajare)यांच्यामुळे देशाचे वाटोळे झाले. गांधी टोपी घातली म्हणून कोणी गांधी होत नाही, असे वादग्रस्त विधान काही दिवसांपासून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी केले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वकिल अॅड. मिलिंद पवार यांच्यामार्फत जितेंद्र आव्हाड यांना बदनामी केल्याप्रकरणी नोटीस बजाविली होती. त्यालाही आव्हाडांनी उत्तर देताना अण्णा […]
Nagar Shahar Co-operative Bank : नगर शहर सहकारी बॅंकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात शहरातील एका बड्या चार्टर्ड अकाऊंटंटला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. बुधवारी सायकांळी दापोली येथून पळून जाण्याच्या बेतात असतांना ही अटक करण्यात आली. विजय मर्दा असं अटक केलेल्या सीएचे नाव आहे. दरम्यान, विजय मर्दा यांना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत […]