‘ज्यांनी राजकारणात आणलं त्यांनाच सोडून गेले, अजित पवार धोकेबाज’; नाथाभाऊंचा घणाघात

‘ज्यांनी राजकारणात आणलं त्यांनाच सोडून गेले, अजित पवार धोकेबाज’; नाथाभाऊंचा घणाघात

NCP Leader Eknath Khadse Criticized DCM Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटातील नेते अजित पवार यांना टार्गेट करत आहेत. यामध्ये एकनाथ खडसे आघाडीवर असतात. शरद पवार (Sharad Pawar) यांनीच अजित पवार यांना राजकारणात आणले. राजकारण शिकवले. बोट धरून राजकारणातले डावपेच शिकवले. तेच अजित पवार शरद पवारांना सोडून गेले. अशा अजित पवार यांच्यासाठी धोकेबाज हा शब्द बरोबरच आहे, अशी घणाघाती टीका खडसे यांनी केली.

‘जरांगेंनी महाजनांची रेकॉर्डिंग व्हायरल केली पाहिजे’ एकनाथ खडसेंकडून मिठाचा खडा

यानंतर एकनाथ खडसेंनी भाजपवरही जोरदार टीका केली. भाजप ईडी, इनकम टॅक्स यांसारख्या यंत्रणांचा वापर करून देशात दहशतीचे वातावरण तयार करत आहे. रोहित पवार यांनी ईडीचे समन्स येणे सहाजिकच होते. बारामती अॅग्रोवर ज्या दिवशी छापे पडले त्याच दिवशी या राजकीय षडयंत्राचे संकेत मिळाले होते. अशाच पद्धतीने राजन साळवी यांच्याविरुद्धही कारवाई झाली. निवडणुकीच्या आधी विरोधकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आमच्या विरुद्ध बोललात तर तुमच्याविरुद्ध आम्ही एक शस्त्र उगारू अशा पद्धतीने सगळे होत आहे, असा आरोप खडसे यांनी केला.

अनियमितता फक्त विरोधकांच्या संस्थांमध्येच आहे का? सत्ताधारी पक्षाच्या एकाही नेत्यावर ईडीची कारवाई का होत नाही. अजितदादा किंवा इतर नेते असतील जे भाजपसोबत जातात ते स्वच्छ होतात. भाजपकडे वॉशिंग मशीन आहे या आणि स्वच्छ होऊन बाहेर पडा,  अशी खोचक टीका खडसेंनी केली. यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारचे कान टोचले.

Eknath Khadse : ‘मराठा समाजाला दिलेला शब्द पाळा’ खडसेंनी फडणवीसांना घेरलं

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मागील एक दोन महिन्यांपासून सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. मंत्री गिरीश महाजन आणि अन्य मंत्री जे आंतरवाली सराटीत गेले होते. त्यांनी काही लिहून दिले होते त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) करत आहेत. तुम्ही जर काही लिहून दिलं होतं तर आता त्याची अंमलबजावणी का करत नाहीत ? पळ का काढता ? असा सवाल राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विचारला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube