नाशिक : “देशातील असं एकही राज्य नाही जिथं मी काँग्रेस पक्षाचं संघटनात्मक काम केलं नाही. राज्यातील एकही तालुका आणि गाव नाही, जिथं मी काँग्रेसचं संघटनात्मक काम केलं नाही.” असं वक्तव्य नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी केले आहे. नाशिक येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेसमधून बाहेर पडून सत्यजित तांबे यांनी स्वतः […]
नाशिक: नाशिकमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने येऊन शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवळाली गाव परिसरात काल सायंकाळी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या समर्थकात राडा होऊन शिंदे गटाचे पदाधिकारी सूर्यकांत लवटेंचा मुलगा स्वप्नील याने बंदूक काढत हवेत गोळीबार केल्यामुळे […]
अहमदनगर : काँग्रेसमधला शेवटचा तरुण म्हणजे राहुल गांधी असल्याची खोचक टीका नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील(sujayvikhepatil) यांनी केलीय. यावेळी त्यांनी राहुल गांधी (rahulgandhi) यांच्यासह काँग्रेस (Congress) पक्षावर सडकून टीका केलीय. ते अहमदनगर शहरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. विखे पुढे बोलताना म्हणाले, मी काँग्रेस पक्षामध्ये असताना पाहिलंय की, काँग्रेसचे नेते आपली आपली […]
अहमदनगर : शहापूर, आळेफाटा परिसरात बिबट्याच्या कातडी, नखांची तस्करी करणाऱ्या अकोले तालुक्यातील उडदावणे व शेरणखेल येथील टोळीच्या मुसक्या पोलीस आणि वन विभागाने आवळल्या आहेत. या टोळ्यांमुळे बिबट्यासह वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अकोल्यात गंभीर बनला आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील कळसूबाई–हरिश्चंद्रगड अभयारण्यातील उडदावणे परिसरात गेल्या दोन आठवड्यापूर्वी गावातील नागरिकांना बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला होता. बिबट्याची […]
अहमदनगर : मला कोणत्याही पक्षात अडकायचं नसल्याचं नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमदेवार सत्यजित तांबे यांनी एका ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना स्पष्ट केलंय. तसेच मी वादळ शांत होण्याची वाट बघतोय, माझी भूमिक लवकरच मांडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. सत्यजित तांबे आणि जळगावच्या एका मतदारामध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. या क्लिपमध्ये सत्यजित तांबे यांनी लवकरच माझी […]
धुळे : नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजित तांबे यांनी फॉर्म भरल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडली होती. तर दुसरीकडे धुळे येथील शुभांगी पाटील यांना भाजपने ए बी फॉर्म दिला नव्हता. आता नाशिक पदवीधर निवडणुकीत एक मोठ ट्विस्ट समोर आला आहे. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील उमेदवार यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. सत्यजित तांबेंना टक्कर देणाऱ्या […]