Rahul Narvekar यांच्या प्रतिमेला जोड्यांचा आहेर, निकालांनंतर ठाकरे गट आक्रमक
Rahul Narvekar :विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना कुणाची आणि १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल निकाल दिला. शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचं नार्वेकर यांनी जाहीर केलं. त्यानंतर शिंदे गटाकडून आनंद साजरा केला जात आहे तर ठाकरे गट या निकालाविरुद्ध आक्रमक झाला आहे. या निकालाचे पडसाद आता नगर शहरात देखील उमटू लागले आहे. नगर शहर शिवसेनेच्यावतीने नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी नार्वेकरांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
10 लाखात तलाठी व्हा! तलाठी पेपरफुटीवरुन विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप…
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल बुधवारी (दि.10) रोजी जाहीर झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल वाचून दाखवला. हा निकाल उद्धव ठाकरेंच्या विरोधात तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. त्यावर आता शिंदे गटाकडून आनंदाच्या तर ठाकरे गटाकडून नाराजीच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिंदेंच्या बंडानंतर सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर काहीसा पडदा पडला आहे. मात्र या निकालानंतर राज्यभर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. याचेच पडसाद नगर जिल्ह्यात देखील पाहायला मिळाले.
‘जलसिंचन, शिखर बॅंक घोटाळ्यात मोदी, फडणवीस अजितदादांना वाचवतात’; शालिनीताईंचा आरोप
नगर शहरामध्ये आज शहर शिवसेनेच्या वतीने नेताजी सुभाष चौकामध्ये भाजपाच्या विरोधात व विधानसभाअध्यक्ष नार्वेकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एकतर्फी निर्णय देणाऱ्या नार्वेकरांचा धिक्कार असो… या गद्दारांचे करायचे काय खाली डोके वरती पाय….‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारण्यात आले. तसेच हा निकाल जरी दिला असला तरी खरा निर्णय हा जनतेच्या न्यायालयात होणार असे यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना कायदा कळत नाही; देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
यावेळी संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यानी नार्वेकरांचा निषेध केला. तसेच विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय अत्यंत चुकीचा असून सरकारच्या दबावाखाली त्यांनी हा निर्णय दिल्याचा आरोप पदाधिकार्यांनी केला. एकतर्फी निर्णय घेऊन त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाबद्दल कशा पद्धतीने आकस आहे हे दाखवून दिलेले आहे व यांचा खरा चेहरा आज उघड झालेला आहे. मात्र काही झाले तरी राज्यातील जनता या गद्दारांना माफ करणार नाही. तसेच ज्यांनी निकाल दिला त्यांच्या विरोधामध्ये पक्ष वरिष्ठ निश्चितपणे दाद मागतील असे देखील यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी म्हणाले.