शिंदेंच्या पराभूत खासदाराची खदखद; राम मंदिरावर फोडले पराभवाचे खापर…

शिंदेंच्या पराभूत खासदाराची खदखद; राम मंदिरावर फोडले पराभवाचे खापर…

Ram Mandir reason defeat says Shivsena Ex MP Sadashiv Lokhande : शिर्डी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे (Sadashiv Lokhande) हे पराभूत झाले. मात्र लोखंडे यांनी आपल्या पराभवाचे खापर हे अयोध्येतील राम मंदिरावर (Ram Mandir ) फोडले आहे. आयोध्यात उभारण्यात आलेले प्रभू श्रीराम मंदिर हे देखील माझ्या पराभवाचे कारण आहे. कारण शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये रावणाला मानणारा मोठा आदिवासी समाज आहे. अयोध्येतील राम मंदिर हे त्यांना भोसले नसल्यानेच माझा पराभव झाला अशी कटकट यावेळी माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी व्यक्त केली.

लोकसभेत आम्ही मोठं मनं केलं आता… विधानसभेपूर्वीच ‘मविआ’त बिघाडी?

कर्जत मध्ये एका कार्यक्रमांमध्ये पत्रकारांशी बोलताना खंडे यांनी केलेल्या विधानामुळे आता एक नवाच वाद उपस्थित होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. लोकसभा मतदारसंघांमधून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सदाशिवराव लोखंडे तर उद्धव ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे हे लोकसभेच्या रिंगणात होते. वाकचौरे यांनी दोन टर्म खासदार असलेल्या लोखंडे यांचा या निवडणुकीत पराभव केला. लोखंडे यांचा पराभव हा चांगला जिव्हारी लागलेला दिसला. पराभवांच्या कारणावरती पत्रकारांशी बोलताना त्यांनी अयोध्येतील राम मंदिर हे टार्गेट केले.

तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना स्टारर ‘अरनमनाई 4’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

लोखंडेबोलताना म्हणाले की, शिर्डी मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी पट्टा आहे. रावणाला मानणारे आदिवासी देखील आहेत. यातच आयोध्या मध्ये श्रीराम मंदिराचे उभारणी करण्यात आली. भाजपाला याचा फायदा होईल असे गणितात देखील आखण्यात आली. मात्र ही गणित शिर्डीमध्ये पूर्णतः फेल झाल्याचे दिसून आले. रावणाला मानणारा आदिवासी गटाला राम मंदिर हे काही रुचले नाही. त्यामुळे मतांचा फटका बसून माझा पराभव झाला. अयोध्येतील राम मंदिर हे देखील माझ्या पराभवाचे कारण आहे अशी खंत देखील यावेळी लोखंडे यांनी व्यक्त केली.

दिग्गजांचा राजकीय संघर्षाचा फटका

शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार जरी लोखंडे विरुद्ध वाकचौरे हे होते. मात्र खऱ्या अर्थाने या मतदारसंघांमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे विरुद्ध माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधातच हा सामना होता. कारखानदारांचे साम्राज्याचे गटतट या मतदारसंघात आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला आणि या संघर्ष मध्येच माझा बळी गेल्याचे देखील यावेळी लोखंडे यांनी म्हणत एक प्रकारे विखेंवरती टीकाच केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube