लोकसभेत आम्ही मोठं मनं केलं आता… विधानसभेपूर्वीच ‘मविआ’त बिघाडी?

लोकसभेत आम्ही मोठं मनं केलं आता… विधानसभेपूर्वीच ‘मविआ’त बिघाडी?

Rohit Pawar Statement on Vidhan Sabha after Lok Sabha : लोकसभा निवडणुका (Lok Sabha) नुकत्याच पार पडल्या. त्यात महायुतीची मोठी पिछाडी झाल्यानंतर महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारली आहे. आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकांची (Vidhan Sabha) तयारी सुरु केली आहे. त्यात महाविकास आघाडीमध्ये मात्र विधानसभेबाबत कॉंग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार यांच्यामध्ये बिघाडी निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात आता शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधानसभेच्या जागा वाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला किती जागा मिळाव्या? याचा अंतिम निर्णय शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसचे सर्व नेते घेतील. मात्र लोकसभेला आम्ही मोठे मन दाखवून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना जास्त जागा दिल्या आहेत. त्यामुळे विधानसभेला त्यांनी मोठे मन दाखवून शरद पवार गटाला जास्त जागा द्याव्यात. अशी कार्यकर्ता म्हणून माझी मागणी आहे. जेणेकरून राष्ट्रवादीला 80 ते 85 जागा मिळतील.

तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना स्टारर ‘अरनमनाई 4’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

तसेच या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांना जयंत पाटील आणि त्यांच्यात सुरू असलेल्या प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, आम्ही तरुण असल्याने थेट बोलतो. मात्र जयंत पाटील आणि माझ्या कोणत्याही वक्तव्यांमध्ये दुमत नाही. मात्र पक्षाकडून निष्ठावानांना संधी दिली जावी. असे मत यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केलं.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा वेगळा सूर

दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कांग्रेस एका खासदारावरून 13 खासदारांपर्यंत मजल मारत राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची 288 जागेवर लढण्याची तयारी सुरु झाली असल्याचं सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोलेंच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरुये. कारण, लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजुट दिसणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज