गटाबाजीमुळे विखेंचा पराभव, जिल्हाध्यक्ष आगरकरांची तातडीने हकालपट्टी करा; भाजपात वादाची ठिणगी

गटाबाजीमुळे विखेंचा पराभव, जिल्हाध्यक्ष आगरकरांची तातडीने हकालपट्टी करा; भाजपात वादाची ठिणगी

Demand for expulsion of BJP district president : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) भाजपला (BJP) नगरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. हा मतदारसंघ हातातून गेल्यानं पक्षात वादाची ठिणगी पडली असून पराभवाचे खापर एकमेकांवर फोडले जात आहे. शहर नेतृत्वाच्या नियोजनाअभावी आणि गटबाजीमुळे सुजय विखेंचे शहरातील मताधिक्य कमी झाल्यानं त्यांचा पराभव झाला, असा आरोप भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड (Vasant Rathod) यांनी केली. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळेंकडे (Chandshekhar Bawankule) तक्रार करत भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकरांची (Abhay Agarkar) तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.

Amitabh Bachchan: बिग बीं यांचा ‘कल्की 2898 एडी’तील दमदार लूक समोर; नवीन पोस्टर रिलीज 

राठोड यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना पाठविलेल्या पत्रात शहर व भिंगार मंडळाबाबत अभय आगरकरांवर गंभीर आरोप केले. पत्रात राठोड यांनी म्हटले आहे की, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या चार दिवस अगोदर अचानक दोनदा बूथ प्रमुखांची यादी बदलली. नगर शहर, केडगाव, सावेडी आणि भिंगार मंडलातील बुथप्रमुख अचानक का बदलले? भाजपचा संबंध नसलेले इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना बूथप्रमुख बनवण्यात आले. यामागे नेमके कारण काय? नवीन बथू प्रमुख हे निवडणुकीच्या दिवशीही बूथवर उपस्थित नसल्याने मतदानावर मोठा परिणाम झाला. पक्षाचे भिंगार मंडलाध्यक्ष असताना सर्व सूत्र शहराचा एक पदाधिकारी पहात होता. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पक्षाने दिलेले घर चलो अभियान व अन्य कार्यक्रम फक्त वरिष्ठांना फोटो पाठण्यापुरतेच राबवले गेले.

महाराष्ट्रात सक्सेस झालेले कृपाशंकर सिंह ‘उत्तर प्रदेशात’ सपशेल गंडले… 

आगरकर यांचे एकूण सगळे वागणे संशयास्पद आहे. कार्यक्रमाचे कुठलेही नियोजन नाही, कार्यकर्त्यांबरोबर समन्वय नाही, तसेच उत्साह नाही. निवडणुकीच्या काळातच गटबाजीचे राजकारण करत पदाधिकाऱ्यांना डावलले. मी स्वत: भिंगार छावणी परिषदेचा उपाध्यक्ष असून सुध्दा त्यांनी नेहमी मला दुय्यम वागणूक देत सक्रीय प्रचार यंत्रणेपासून दूर ठेवले. ते अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी माझ्यासह अनेक निष्ठावंत पदाधिकाऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम आणि अविश्वास निर्माण झाल्याचं राठोड म्हणाले.

आगरकरांची तातडीने हकालपट्टी करा
शहरांच्या अध्यक्षांचा अशा कारभार संशयास्पद आहे. याचा मोठा परिणाम उमेदवाराच्या मताधिक्यावर झाला. याची पुनरावृत्ती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी अशा नेतृत्वहीन, गोंधळलेल्या मानसिकतेच्या, द्विधा मनस्थितीत अडकलेल्या व व्यक्ती द्वेषाने पछाडलेल्या आगरकरांची तातडीने हकालपट्टी करून नवीन उत्साहाच्या कार्यकर्त्याला शहर जिल्हाध्यक्ष पद द्यावे. ज्या योगे विधानसभेत नगर शहरातून भाजपचा आमदार होईल, असं पत्रात नमूद केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज