Sujay Vikhe : तुमची साखर – डाळ नको , गावाला पाणी द्या… गावकऱ्यांनी विखेंना घेरलं
Sujay Vikhe : भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्याकडून नगर दक्षिणेत (Nagar South) सुरु असलेल्या साखर डाळ वाटपामुळे ते चर्चेत आहेत तर काही ठिकाणी त्यांना नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील पाथर्डी तालूक्यातील भालगाव येथे आयोजक एका कार्यक्रमात विखे यांच्याकडून साखर व डाळीचे वाटप सुरु असताना संतप्त नागरिकांनी विखेंना प्रश्नांनी घेरलं. ‘आम्हाला तुमची डाळ-साखरेची भेट नको, आमच्या गावाला पाणी द्या’ असे संतापून नागरीक बोलताना व्हिडिओमध्ये दिसले. यानंतर सुजय विखेंनी त्याच्या पाणी योजनेची माहिती दिली. या संदर्भातला व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
प्रभासनंतर आता रणबीर साकारणार श्रीराम! सीतेच्या भूमिकेत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री
अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या निमित्ताने खासदार सुजय विखे यांच्याकडून नगर दक्षिणेतील तालुक्यांमध्ये दाळ-साखर वाटप सुरू आहे. अनेक ठिकाणी वाटप झाले असून ज्याठिकाणी राहिले त्याठिकाणी वाटप सुरु आहे. नुकतेच पाथर्डी तालुक्यातील भालगावात विखे पाटील आणि आमदार राजळे यांच्याकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Thane News : धक्कादायक! आश्रमशाळेतील 109 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; रुग्णालयात दाखल
कार्यक्रम सुरु झाला मान्यवर मंचावर उपस्थित असताना सुजय विखे पाटील यांचे भाष्य सुरु झाले. त्याचवेळी समोर बसलेल्या समूहातून एकाने तुम्ही ‘पाच वर्षात खासदार म्हणून काय केलेत?’ असा सवाल केला. यावर विखे म्हणाले, ‘सांगतो ना, ऐका ना…’यावर ग्रामस्थ संतापले व काही एक न ऐकता तुम्ही काय सांगता? तुमच्या योजना येऊ द्या मग बोला’, तसेच ‘पाणी दिले तर गावात येऊ असा तुमचा शब्द तुम्ही पाथर्डीकरांना दिला होता, याची आठवण देखील ग्रामस्थांनी सुजय विखेंना करून दिली. त्यामुळे या कार्यक्रमात सुजय विखेंना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले.
शंका असेल तर चला विकासकामे दाखवून देतो…
उपस्थित जनतेकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर विखे बोलताना म्हणाले, पाण्याची योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडली होती. आम्ही अलीकडेच तिला मंजुरी मिळवून आणली आहे. त्यामुळे तुमची मागणी नक्की पूर्ण होईल. ज्यांना कोणाला यासंबंधी शंका असेल त्यांनी माझ्या सोबत चला सत्य परिस्थिती काय आहेत मी दाखवून देतो. तुम्ही आमच्या विखे पाटील परिवाराला किती वर्षांपासून ओळखता? आम्ही दिलेला शब्द पाळतो, असेही विखे पाटील यांनी सांगितले.