BJP जिल्हाध्यक्षाचा पराक्रम; हॉटेलात दारु पिऊन महिलांना डान्स करायला लावला

BJP जिल्हाध्यक्षाचा पराक्रम; हॉटेलात दारु पिऊन महिलांना डान्स करायला लावला

अहिल्यानगर  : अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचे (BJP) उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर (Nitin Suresh Dinkar) यांनी महिलांना पदाचं अमिष देऊन हॉटेलला बोलावलं, स्वत: दारु पिऊन महिलांना डान्स करायला लावलंय. त्यामुळे नितीन सुरेश दिनकर यांच्या पदाचा त्वरित राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) केली आहे.

पंढरीच्या वारीमध्ये अर्बन नक्षली शिरले, आमदार मनिषा कायंदेंचा खळबळजनक दावा 

तृप्ती देसाई म्हणाल्या की, उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर हे पदाचे आमिष देऊन महिलांना धाब्यावर बोलावतात. बियर बारमध्ये बोलवतात. स्वतः दारू पिऊन महिलांना डान्स करायला लावतात. ते आपल्यापदाचा अशाप्रकारे गैरवापर करून महिलांना त्रास देत आहेत, अशा पद्धतीची लेखी तक्रार भूमाता ब्रिगेडच्या कार्यालयात दिनकर यांच्या विरोधात काही महिलांनी दिली आहे. दिनकर यांना पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे त्याची दहशत माजवून इतरांवर अनेक खोटे गुन्हे सुद्धा त्यांनी दाखल केले आहेत, अशी ही तक्रार महिलांनी भूमाता ब्रिगेडकडे दिल्याचं देसाई यांनी सांगितलं.

पाकिस्तानी सेलिब्रिटी, क्रिकेटपटूंना दिलासा; सोशल मीडिया खात्यावरील बंदी उठवली 

तृप्ती देसाई म्हणाल्या, नितीन दिनकर ही व्यक्ती राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या जवळची असल्यामुळे त्यांच्या विरोधात जाहीरपणे कोणी बोलत नाही. बोलल्यास ते एखाद्या गुन्ह्यात अडकवतात. श्रीरामपूर येथे एका माजी मंत्र्यांच्या बंगल्यात दिनकर यांचे वास्तव्य असून तिथे अनेक गैरप्रकार चालतात, असंही महिलांनी सांगितल्याचं देसाई म्हणाल्या.

महिलांनी याबाबतचा जून महिन्यातील श्रीरामपूर जवळील ढाब्यामधील दारू पिऊन मित्रांबरोबर डान्स करताना तसेच पदासाठी बोलावलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनाही जबरदस्ती डान्स करायला लावत आहेत, असा एक व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहे.

अहिल्यानगर येथील भाजपचे जिल्हाध्यक्ष महिलांबाबतीत असे चुकीचे कृत्य प्रकार करत असतील तर त्याला आळा घालणे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी तातडीने नितीन दिनकर यांचा राजीनामा घेऊन त्यांचे पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे मेलद्वारे केल्याचं तृप्ती देसाई म्हणाल्या.

तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष, राम शिंदे यांनाही सदर तक्रार मेलद्वारे केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून याची पूर्णपणे माहिती घ्यावी, असंही देसाई यांनी म्हटलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube