Operation Tiger 3: ऑपरेशन टायगर 3, ठाकरेंना पुन्हा धक्का; 10 आमदार सोडणार साथ?

Operation Tiger 3 : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऑपरशन टायगर अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार

Operation Tiger 3

Operation Tiger 3 : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऑपरशन टायगर अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांना पक्षात प्रवेश देत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. तर आता आणखी एक मोठा धक्का उद्धव ठाकरेंना बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर 3 ची तयारी सुरु असून लवकरच ठाकरे गटातील 10 आमदार पक्षाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

माहितीनुसार, ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) तब्बल 10 आमदारांचे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी पूर्णपणे मन वळवण्यात आले आहे. या आमदारांसोबत गेल्या काही दिवसांपासून गुप्त बैठका आणि भेटीगाठी सुरु होत्या. पक्षांतरबंदी कायदा टाळण्यासाठी 10 आमदारांची आवशक्यता असल्याने आणखी ठाकरेंचे पाच आमदार फोडण्यासाठी शिंदे (Eknath Shinde) गटाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटातील कोणते आमदार पक्षाची साथ सोडत शिवसेना (Shivsena) शिंदे गटात प्रवेश करणार? सध्या याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या एका खासदाराशी देखील संपर्क साधण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.

पेट्रोल ₹88.66 तर डिझेल ₹84.56; जाणून घ्या आजचे दर –

ठाकरेंचे आमदार पक्षात आण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे निलेश देशमुख यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील काही दिवसात ऑपरेशन टायगर यशस्वी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देखील काही आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.

follow us