Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट घेऊन अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये एन्ट्री घेतली. त्यांच्यासह आमदारांना वजनदार खाती मिळाली. तरीदेखील मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून अजित पवार गट आणि भाजपात धुसफूस सुरू होती. अखेर या वादावरही समाधानकारक तोडगा काढला असून अजित पवारांच्या गटाला गुडन्यूज मिळाली आहे. ज्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून चंद्रकांत पाटील […]
नांदेड : “या राज्यातील शासकीय रुग्णालये ही गोरगरिबांचे कत्तलखाने बनली आहेत. इतकं अकार्यक्षम आणि असंवेदनशील सरकार या राज्याने कधीच अनुभवलेले नाही.” असं म्हणत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमधील शासकीय रुग्णालयातील मृत्यूच्या सत्रानंतर शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. (NCP (Sharad Pawar) group leader Jitendra Awad criticizes Shinde government after […]
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर तिन्ही गटातील धुसफूस (Maharashtra Politics) वाढल्याचे दिसत आहे. अजितदादांची एन्ट्री, त्यांच्या आमदारांना वजनदार खाती, त्यानंतर सीएम शिंदे (Eknath Shinde) आणि अजितदादा यांच्यातील कोल्डवॉरच्या आलेल्या बातम्या. पुढे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असो किंवा थेट मंत्रालयात बैठका घेणे असो, मंत्र्यांच्या अधिकारात हस्तक्षेप असो अशा काही कारणांमुळे […]
Nanded Hospital Deaths : नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील 31 जणांचा मृत्यू (Nanded Hospital Deaths) झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. टीकेची झोड उठवली. खूनी सरकार म्हणत सरकावर थेट हल्ला केला. त्यानंतर सरकारनेही या प्रकाराची चौकशी लावली आहे. तर वैद्यकिय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) […]
नांदेड : हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना शौचालय साफ करायला लावल्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी हेमंत पाटील यांच्यावर सोशल मिडीयातून मोठ्या […]
नागपूर : नांदेड, छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ आता नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्येही मृत्यूचे सत्र पाहायला मिळत आहे. नागपूरच्या मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांमध्ये 24 तासांत 25 रुग्ण दगावले आहेत. यात मेडिकलमधील 16 आणि मेयोमधील 9 रुग्ण दगावले आहेत. विविध वयोगटातील हे रुग्ण असून त्यातील काहीजण परराज्यातील असल्याचीही माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यातील काही रुग्ण मध्यप्रदेश, छत्तीसगड […]