नागपूर : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले. करोना काळानंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर नागपूरमध्ये होणारं हे पहिलेच अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कर्नाटक सीमावाद आणि कर्नाटक सरकारची भूमिका यावर विरोधी पक्ष आक्रमक झालेला पाहायला मिळाला. सीमावाद प्रकरणी कर्नाटकच्या बेळगाव जिल्हाधिकारी यांनी मंत्र्यांना बंदी कशी घातली, त्यांना कोणता अधिकार आहे? ही दडपशाही खपवून घेणार […]
मुंबई : अनेक अमराठी कलाकारांची पावलं मराठी चित्रपटसृष्टीच्या दिशेने वळत आहेत. तर अनेक जण मराठीत पदार्पण करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. ‘सुर्या’ या आगामी मराठी चित्रपटात मराठमोळे अभिनेते हेमंत बिर्जे यांनी सोनं केलं आहे. नायक बनून सिनेसृष्टीत दाखल झालेल्या हेमंत यांनी मराठी सिनेसृष्टीत खलनायकाच्या भूमिकेतून पदार्पण केलं आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन […]
नागपूरः नागपूरला आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी राज्यातील अनेक प्रश्नांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. हे सरकार कोणाचे काही ऐकत तर केवळ गद्दार मंत्र्यांचे ऐकतात, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केलाय. महाराष्ट्रात अनेक मुद्दे समोर येत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे. पण […]
मुंबई : ‘सुर्या’ या मराठी चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा नुकताच दिमाखात संपन्न झाला. चित्रपटाच्या ट्रेलरची आणि गीतांची झलक यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आली. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत आणि एस.पी मोशन पिक्चर्स, डीके निर्मित ‘सुर्या’ या अक्शनपॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांचे आहे. समाजातील विघातक प्रवृत्ती जेव्हा वरचढ ठरते तेव्हा, त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी एक […]
नांदेड : नांदेडमध्ये भाजपकडून पाकिस्तान आणि परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळण्यात आला. तर पुतळा जाळताना भडका उडाल्याने खासदार प्रताप चिखलीकर यांचा हात भाजला आहे. यावेळी जवळ असलेल्या कार्यकर्त्याने प्रसंगावधान दाखवत तात्काळ आग विझवली. यामध्ये चिखलीकरांचा हात किरकोळ भाजला. गेल्या काही दिवसांपुर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल […]
मुंबई : यंदाच्या 19 व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवात इराणच्या ओपन सिजन या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०२२ चा १९ वा थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव १२ ते १८ डिसेंबर २०२२ या सप्ताहात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे पार पडला. महोत्सवाचा सांगता समारंभ ‘पर्यटन व सांस्कृतिक कार्य […]