नागपूर : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं मोठी घोषणा केलीय. शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. कारण विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दरमहा विद्यावेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होणारय. अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना 40 रुपये विद्यावेतन दिले जात होते. त्यात आता मोठी वाढ होणार असून 500 रुपयांचं विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कौशल्य विकास […]
नागपूर : कोकणातील सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याचा ठराव विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या वर्षीच सप्टेंबरमध्ये चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै विमानतळ असे नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. यानंतर हा प्रस्ताव विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधील सदस्यांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सप्टेंबर […]
पुणे : सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा शनिवारी (ता.२४ डिसेंबर) पहाटे अपघात झाला होता. यामध्ये आमदार गोरे जखमी झाले असून त्यांचे सहकारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या संकट काळात आमदार गोरेंनी पहिला फोन लावला तो […]
नागपूर : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी होताना दिसून येत आहे. त्यातच आज याच मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ झाला. सीमा प्रश्नावर सभागृहात ठराव न मांडल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्या अशी सभागृहात विनंती करुनही सरकारने दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडीच्या […]
नागपूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन राज्यात मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी होताना दिसून येत आहे. आज विधानसभेत सीमावादावर प्रस्ताव मांडण्यात येणार होता. मात्र हा प्रस्ताव आजही मांडण्यात येणार नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यानंतर विरोधकांनी गदारोळ करत सभात्याग केला. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी आज […]
मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केलीय. सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय की, नागपुरात तब्बल 110 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झाला तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार करणाऱ्यांना क्लीनचिट देत फिरताहेत. भाजपचे लोक सत्यवचनी रामाचं नाव घेत भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांचं भजन गात आहेत. हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार म्हणायचे का? […]