सांगली लोकसभेत विजय खेचून आणत आम्हीच सांगलीचे किंग असल्याचं अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी सिद्ध करुन दाखवलं आहे.
कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांना आतापर्यंत 2 लाख 92 हजार 040 मते मिळाली असून त्यांनी 24739 मतांनी आघाडी घेतली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी अखेर विजय खेचून आणत पराभवाचा वचपा काढला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उदयनराजेंनी पराभव केलायं.
भाजपचे सुनील मेंढे यांना 1 लाख 72 हजार 790 मते मिळाली असून दीड हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
संजय देशमुख यांनी आतापर्यंत 2 लाख 19 हजार 253 मते मिळाली असून त्यांनी 36 हजार 763 मतांना आघाडी घेतली.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून पश्चिम महाराष्ट्रातील माढा, माळशिरस, शिरुर, हातकणंगले, बारामती आणि कोल्हापुरात महाविकास आघाडीचाच डंका असल्याचं दिसून येतंय.