अजितदादा मुख्यमंत्री होणार का? गिरीश महाजनांनी खरं काय सांगूनच टाकलं

अजितदादा मुख्यमंत्री होणार का? गिरीश महाजनांनी खरं काय सांगूनच टाकलं

Girish Mahajan : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल ठिकठिकाणी शुभेच्छा फलक लागले होते. तर आमदार अमोल मिटकरी यांनी तर थेट मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की.. असे ट्विट केले होते. या घडामोडींमुळे काल दिवसभर राज्याच्या राजकारणात याचीच चर्चा सुरू होती.

तसेही अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सुरुच असतात. आता यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केले आहे. अमोल मिटकरी यांचा हेतू शुद्ध आहे. आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा अशी भावना त्यांनी वाढदिवसाच्य शुभेच्छांतून व्यक्त केली. पण, राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत.

एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाणार? केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं…

भावी मुख्यमंत्र्याच्या चर्चेत काही तथ्य नाही. थोडेफार अतिउत्साही कार्यकर्ते असतात. 2024 च्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच होणार आहेत. पक्षश्रेष्ठींनी थेट सांगितलं आहे. सध्या तरी मुख्यमंत्री बदलण्याचा कोणताही विषय नाही. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितलं आहे की 2024 च्या निवडणुका शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवायच्या आहेत, असे महाजन म्हणाले.

अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करणं हा आततायीपणा आहे. असं कुणीही करू नये. आज आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आधीच सांगितलं आहे की शिंदे यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुकी लढवणार आहोत. तेव्हा असा काहीतरी विषय काढून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये.

‘अहवाल चुकीचा असेल तर…’; आमदार संजय शिरसाटांचा सुनील केंद्रकरांना इशारा

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलेल्या टिकेवरही महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात 1700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सरकारला लक्ष देण्यास वेळ नाही. असे खडसे म्हणाले होते. त्यावर महाजन यांनी खडसेंना प्रत्युत्तर दिले. खरंतर खडसेंना आता दिवसा स्वप्न पडायला लागलं आहे. त्याला काही इलाज नाही. खडसेंनी पक्ष बदलला. त्यामुळे त्यांची बाजू बदलते. खडसे सध्या अस्वस्थ आहेत. पण, त्याला काही इलाज नाही, असा टोला महाजन यांनी लगावला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube