पारनेरमध्ये राजकारण तापणार…महायुतीचा नगराध्यक्ष होणार…
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात नगरपंचायत निवडणूक पार पडणार आहे मात्र आता त्यापूर्वीच मतदार संघात राजकारण तापणार असे चित्र दिसू लागले आहे.
Politics to heat up in Parner : आगामी काळात नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात नगरपंचायत निवडणूक पार पडणार आहे मात्र आता त्यापूर्वीच मतदार संघात राजकारण तापणार असे चित्र दिसू लागले आहे. आम्हीच येथे कायम आहोत, असे कोणाला वाटत असेल तर त्यांनी हा गैरसमज दूर करावा कारण येणाऱ्या काळात महायुतीचा नगराध्यक्ष पारनेर मध्ये होणार असा विश्वास नगरसेवक युवराज पठारे यांनी केला.
पारनेर मध्ये राजकीय दृष्ट्या पहिले तर विखे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर जास्त लक्ष घातले आहे. यातच सुजय विखे यांच्याकडून महायुतीच्या कार्यकर्त्यांना बळ देखील दिले जाते आहे. नुकतेच तालुक्यातील पाणीप्रश्नसाठी देखील मंत्री विखे यांनी पुढाकार घेतला यामुळे येणाऱ्या नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी कार्यकर्ते तयारीला लागले आहे.
‘भाईला काही येवो अगर न येवो फॅशन सेन्स जबरदस्त आहे’, अभिजित दीपके यांची पंतप्रधान मोदींवर जहरी टीका
नुकतेच पारनेरमध्ये नगरसेवक युवराज पठारे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच या माध्यमातून राजकीय शक्तिप्रदर्शन देखील पठारे यांनी केले. यावेळी पठारे समर्थकांकडून पठारे यांचा ‘भावी नगराध्यक्ष… म्हणून उल्लेख करण्यात आला.
यावेळी नगरसेवक युवराज पठारे यांनी आगामी राजकीय नेतृत्वाबाबत भूमिका मांडताना, “माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार काशिनाथ दाते यांच्या विचारांचा नगराध्यक्ष येणाऱ्या काळात पारनेर शहराला मिळेल. आम्हीच येथे कायम आहोत, असे कोणाला वाटत असेल तर त्यांनी हा गैरसमज दूर करावा,” असे सांगितले.