राजकारणात इकडून तिकडे तिकडून इकडे चालणारच, शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

राजकारणात इकडून तिकडे तिकडून इकडे चालणारच, शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

Chhagan Bhujbal : राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र त्यानंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी मी शरद पवार यांच्याशी आरक्षणाच्या मुद्यावर भेटलो होतो अशी प्रतिक्रिया दिली होती.

मात्र राजकीय वर्तुळात भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार आहे आणि भुजबळ लवकरच पुन्हा शरद पवार गटात सामील होणार अशी चर्चा सुरु आहे.

तर आज माध्यमांशी बोलताना तुम्ही पुन्हा एकदा शरद पवार गटात प्रवेश करणार का? असा प्रश्न भुजबळ यांना विचारण्यात आला होता, यावर प्रतिक्रिया देत भुजबळ म्हणाले, मीडियाने राजकारण आणि समाजकारण एकत्र करू नये. तुमची टीआरपी वाढेल मात्र राज्यातील नागरिक संकटात येईल. राजकारण म्हणजे सगळं आहे .. मंत्री म्हणजे सगळं आहे .. आमदार म्हणजे सगळं आहे का? मी राज्यातील जनतेसाठी काम करतो, जनतेला प्राधान्य दिला पाहिजे आणि शरद पवार जनतेला प्राधान्य देणार आहे . असं भुजबळ म्हणाले.

तसेच राज्यात सुरु असणाऱ्या आरक्षणाच्या मुद्यावरून मी शरद पवारांची भेट वारंवार घेणार आणि यावर तोडगा काढण्याची त्यांचा जवळ मागणी करणार असं देखील भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले.

तर पिंपरी- चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) काही नगरसेवकांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. यावर देखील भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली . जस जसं निवडणूक जवळ येते तस तसं काही नेते इकडून तिकडे तिकडून इकडे करत असतात, राजकारणात हे चालते. कोणाला जर या पक्षातून तिकटी मिळाला नाही तर तो दुसऱ्या पक्षात जातो आणि तिकडून निवडणूक लढवतो. पुढील 3-4 महिने हे चालणार त्यामुळे याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

‘विशाळगड प्रकरणात गुप्तचर विभागाकडे माहिती होती, मात्र सरकारने …,’ विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

तर आज पहिल्यांदा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्याशी झालेल्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. मला त्या दिवशी ताप होता, मी दोन दिवस सुट्टी घेतली होती. मला सांगितलं भुजबळ साहेब एक तासापासून आले आहे. जायचंच नाही म्हणतात. त्यानंतर त्यांनी मला काही गोष्टी सांगितले. या गोष्टी केलं तर राज्याचं हित आहे असे ते म्हणाले होते. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार बोलत होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube