पूजा खेडकरची आधी नाव आता वयातही अफरातफर; तीन वर्षांत एक वर्षांने वाढलं वय

पूजा खेडकरची आधी नाव आता वयातही अफरातफर; तीन वर्षांत एक वर्षांने वाढलं वय

Pooja Khedkar Cheated UPSC by mixing age and change name : वादग्रस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या कारनाम्यांची यादी खूप मोठी आहे. कारण त्यांचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. आता त्यांनी युपीएससीला (UPSC) परीक्षा देताना अटेम्प्ट संपलेले असताना नाव बदलून परीक्षा दिली. तर आता त्यांनी वयामध्ये देखील घोळ घालत युपीएससीला फसवलं आहे.

Pooja Khedkar : ‘जेव्हा निर्णय होईल तेव्हा मी…’, IAS पूजा खेडकरांनी स्पष्टच सांगतिले

त्यांनी 2020 मध्ये दिलेल्या सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे सीएटी 2023 मध्ये दिलेली यूपीएससी या परीक्षांसाठी भरलेल्या अर्जांमध्ये तीन वर्षांचे अंतर असतानाही वयाचा फरक केवळ एका वर्षाचा आहे. म्हणजे तीन वर्ष झाल्यानंतरही त्यांचं वय केवळ एका वर्षांनी वाढल्याचे दाखवण्यात आलं होतं. तसेच 2023 च्या अर्जामध्ये त्यांनी अपंग व्यक्तींसाठी असलेली वयाच्या कमाल मर्यादेतील सूट मिळण्याची मागणी केली होती.

खेळाडूंना अंतिम इशारा, तीन महिन्यातून एकदा टेस्ट; पाकिस्तान क्रिकेटचा नवा प्लॅन तयार

तसेच त्यांनी दोन्ही अर्ज नावांमध्ये थोडा बदल करून भरले. 2020 च्या अर्जामध्ये खेडकर पूजा दिलीपराव आणि 2023 मध्ये पूजा मनोरमा दिलीप खेडकर अशी नाव दिली होती. त्यांची ही दोन्ही नावं युपीएससी लिस्टमध्ये आहेत. दरम्यान यूपीएससीच्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आयोगाकडून 32 वर्षांपर्यंत परीक्षा देण्याच्या सहा संधी दिल्या जातात तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयाची 35 वर्षे पूर्ण होईपर्यंत नऊ संधी मिळतात.

AMKDT: ‘औरों में कहाँ दम था’ सिनेमातील नवीन गाण्याचा धमाकेदार टीझर रिलीज

पूजा खेडकर यांच्यावर कोणते आरोप?

वादग्रस्त अपगंत्व प्रमाणपत्र देऊन IAS ची पोस्ट मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिवाय वडिलांची 40 कोटींची संपत्ती असूनही त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. तब्बल सहावेळा पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहण्याचे टाळले. तसेच नुकतीच बदली झालेल्या वाशिमला देखील त्या रूजू झालेल्या नाहीत. खेडकर हे व असे अनेक कारनामे समोर येत आहेत.

पुजा खेडकर प्रकरणात आयकर विभागाची एन्ट्री!

या प्रकरणात आयकर विभागाची एन्ट्री झाली आहे. खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी मिळवलेल्या नॉन क्रिमिलेयर दाखल्याची चौकशी करून तसा अहवाल मागवण्यात आला आहे. यासाठी आयकर विभागाने खेडकर कुटुंबियांच्या उत्पन्नाची आणि त्यांच्या आई वडिलांनी भरलेल्या टॅक्सची माहिती मागवण्यात आली आहे. नगर जिल्हा प्रशासनानेही ही माहिती गोळा करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube