गोकुळ सत्तासंघर्ष ; महायुतीत अंतर्गत वाद, शिवसेना आक्रमक? प्रकाश आबिटकर म्हणाले…

Prakash Abitkar  : कोल्हापुरातील गोकुळ दूध उत्पादक संघातील अध्यक्षपदावरुन सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. महायुती सरकारने मोठा निर्णय

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Prakash Abitkar
Prakash Abitkar  : कोल्हापुरातील गोकुळ दूध उत्पादक संघातील अध्यक्षपदावरुन सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. महायुती सरकारने मोठा निर्णय घेत गोकुळमध्ये शासननियुक्त चार संचालक नेमले आहे. राज्य सराकारच्या या निर्णयानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासह विरोध चारही बाजूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसत आहे. सरकारने अध्यादेश काढून या संचालकांना मतदानाचा अधिकार दिला आहे. तर दुसरीकडे सरकारच्या या निर्णयानंतर महायुतीमध्ये वाद निर्माण झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेवर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. यावर आता कोल्हापुराचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते प्रकाश आबिटकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
माध्यमांशी बोलताना प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे (Mahayuti) सर्व घटक पक्ष पूर्णपणे एकजुटीने काम करत आहेत. गोकुळ (Gokul) दूध संघाच्या निर्णयाबाबत शिवसेना (Shivsena) नाराज असल्याच्या वृत्तात तथ्य नाही. राज्य सरकार आणि महायुतीच्या सर्व प्रमुख निर्णयांमध्ये शिवसेनेचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप (BJP) , शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या तिन्ही पक्षात चांगला संवाद आहे. घटक पक्षात कोणताही असंतोष नाही असा दावा देखील त्यांंनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
 तर दुसरीकडे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना सतेज पाटील म्हणाले की, गोकुळसंदर्भात चार शासननियुक्त संचालक नेमण्याच्या निर्णयामागे मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे षडयंत्र आहे. या दोघांनीच असा नियम आणण्याचे पाप केले आहे. सरकारचा हा निर्णय गोकुळच्या मतदारांचा अपमान आहे असं सतेज पाटील म्हणाले. तसेच 9  नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात येणार असल्याची देखील माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

follow us