राज-उद्धव युतीच्या चर्चेदरम्यान ‘राणे-महाजन’ कलगीतुरा; राजकारणात लवंग-विलायचीची तुलना!

Rane-Mahajan’ controversy during Raj-Uddhav alliance talks: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे (राज ठाकरे) यांच्या संभाव्य युतीच्या चर्चेनं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी या चर्चांवर मिश्कील टोला लगावत, “एकाचे वीस आमदार, दुसऱ्याचे शून्य; त्यांच्या युतीने आम्हाला काहीच फरक पडणार नाही,” असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानानं मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गट, तट करू नका, चुकीचे वागले तर हयगय केली जाणार नाही; अजितदादांचा सज्जड दम
मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नितेश राणेंना चपखल उत्तर दिलं. या प्रकरणात खरी मजा येथेच आली. “नितेश राणेंची वैचारिक उंची उभं राहिल्यावर लवंगाएवढी, बसल्यावर विलायची एवढी!” या एका वाक्यानेच सोशल मीडियावर चर्चेचा नवा ट्रेंड सुरू झाला. मग काय, मुलावर टीका झाली की वडील शांत बसतील का? नारायण राणे यांनीही मैदानात एंट्री घेत, “प्रकाश महाजन कोण आहेत? आमच्या वैचारिक उंचीचं प्रमाणपत्र देणारे ते कोण?” असा थेट सवाल केला. त्यामुळे वादाची तीव्रता आणखी वाढली.
Satara Politics : पाटणकरांच्या भाजप प्रवेशावेळी उदयनराजे हजर; शंभुराज यांना सिग्नल दिलाय
सध्या सोशल मीडियावर ‘राणे-महाजन’ वाद सुपरहिट ठरला आहे. मीम्स, ट्वीट्स, आणि ‘वैचारिक वजनकाटे’ यावर नेटिझन्सची चर्चा रंगली आहे. दोन्ही ठाकरेंच्या युतीच्या सत्यनारायणाची पूजा कुणाच्या (ठाकरेंच्या) घरी चालू आहे की नाही, हे माहित नाही, पण त्याचा ‘प्रकाश’ मात्र थेट राणे-महाजनांच्या वादावर पडला आहे!
Video : मी काय माझ्या खिशातले पैसे देतो का?, निधी वळवल्याच्या आरोपांवर अजित पवार…
राजकारणात टीका-प्रत्युत्तर नेहमीच रंगतात, पण यावेळी विषय वैचारिक उंचीचा असताना तुलना झाली – लवंग आणि विलायचीची! ठाकरे-मनसे युतीच्या चर्चांवरून सुरू झालेला हा कलगीतुरा आता सोशल मीडियावरही गाजत आहे. पुढे काय घडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ही राजकीय जुगलबंदी पुढे कोणत्या वळणावर जाईल, कोणाची उंची खरी ठरेल, आणि ठाकरे-मनसे युतीचा प्रकाश कुणावर पडेल, हे पाहणे रंजक ठरणार आहे!