‘हा’ असेल विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा; सामनातून राऊतांनी थेट सांगितलं

‘हा’ असेल विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा; सामनातून राऊतांनी थेट सांगितलं

२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी अवघे एक वर्ष राहिले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक आपली एकजूट करण्याचे काम करत आहे. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पटना येथील निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेदेखील उपस्थित राहणार असल्याचे कळते आहे.

परंतू विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार याबाबत कायम प्रश्न उपस्थित केले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यासमोर कोण चेहरा असणार यावरुन भाजपदेखील विरोधकांना डिवचत असते. आता मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सामनातून विरोधकांच्या नेत्याचे नाव सांगितले आहे.

आयपीएल डॉट बॉल, बीसीसीआय आता किती झाडं लावणार?

 

संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून याबाबत उत्तर दिले आहे. आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा संविधान आणि भारतमाता हाच आहे. लोकांमधून नेता निर्माण होईल. रावणराज्याचा अंत होण्यासाठी वानरसेनाही बरोबर घ्यावी लागेल, असे यात म्हटले आहे.

कर्नाटकातील निकाल भाजपसाठी धक्कादायक होते. त्यामुळे मोदी आणि शाह यांच्या चेहऱ्यावरचा रंग साफ उडाला आहे. या निकालानंतर भाजपला दक्षिणेतील एकमेव दरवाजा बंद झाला आहे, असं सांगतानाच नव्या संसंदेत सेंगोल आणला तरी तामिळनाडूतील जनता द्रमूक सोडून भलत्यासलत्यांच्या मागे पळत नाही, असेही राऊतांनी अग्रलेखात म्हटले आहे.

SSC Result 2023 : आज जाहीर होणार दहावीचा निकाल; ‘असा’ पहा निकाल

यासह अग्रलेखामध्ये आगामी निवडणुकांच्यादृष्टीने अनेक दावे करण्यात आले आहे. पुढील काळात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढसह चारेक राज्यांत निवडणुका होतील. यातील मध्य प्रदेश भाजपकडे राहणार नाही. महाराष्ट्राप्रमाणे एका शिंद्यांस काँग्रेसमधून पडून भाजपने मध्य प्रदेशात सरकार बनवले. ते कमालीचे अलोकप्रिय ठरले आणि भाजप त्यामुळे गाळात जात आहे. छत्तीसगढ पुन्हा काँग्रेसकडेच जाईल. राजस्थानात जादूगार अशोक गेहलोत भाजपास सहजासहजी पुढे जाऊ देणार नाहीत. हे चित्र जनमताचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याचे द्योतक आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube