चंद्रहार पाटलांना नवखा म्हणणाऱ्यांना पवारांच उत्तर! म्हणाले, सांगलीला पैलवान खासदार होता

चंद्रहार पाटलांना नवखा म्हणणाऱ्यांना पवारांच उत्तर! म्हणाले, सांगलीला पैलवान खासदार होता

Lok Sabha Election : लोकसभेच्या मैदानात सगळ्याच पक्षाचे नेते उतरले आहेत. महायुतीकडून महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जोरदार सभा होत आहेत. तर, शरद पवारांनीही महाविकास आघाडीकडून मैदान गाजवून सोडलय. (Sharad Pawar) आज महाविकास आघाडीचे सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधकांवर जोरदार हमला केला.

मारुती मानेंची आठवण सांगितली

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, शिवसेनेने दोनवेळा महाराष्ट्र केसरी झालेले चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली तेव्हा सर्वच लोकांच्या प्रतिक्रिया नकारात्मक होत्या. हे कोण चंद्रहार पाटील? यांना लोकभेचा काय अनुभव असंही लोकं त्यावेळी म्हणत होते. मात्र, मारुती माने हे सांगलीचे खासदार होते. ते हिंद केसरी होते. अशी आठवण सांगून चंद्रहार पाटीलही नक्की चांगलं काम करतील असं मत व्यक्त केलं.

 

अनेक तरुण चांगल काम करतात

कुस्तीच्या माध्यमातून चंद्रहार पाटील यांनी सांगलीसह महाराष्ट्राचं नाव देशभरात पोहचवलं आहे. ते आता संसदेत जाऊनही सांगलीसह महाराष्ट्राचा नवा ठसा उमटवतील असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच, मी स्वत: महाराष्ट्र कुस्ती महासंघाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे असे अनेक तरुण चांगल काम करणारे आहेत हे मी जवळून पाहीलं आहे, असंही पवार म्हणाले.

 

यांच काय योगदान

यावेळी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. पवार म्हणाले, मोदी सभेत काय बोलतात तर फक्त टीका करतात. आणि कुणावर टीका करतात तर माजी पंतप्रधान पंडीत नेहरू, राजीव गांधी यांच्यावर टीका करतात. परंतु, नेहरू यांनी स्वातंत्र्य लढ्यात सुमारे 12 ते 13 वर्ष जेलमध्ये काढले. ते देशाला स्वातंत्र्या मिळावं म्हणून लढले. मात्र, स्वातंत्र्य लढ्यात कसलंच योगदान नसलेले हे लोक त्यांच्यावर टीका करतात, असा थेट घणाघात पवार यांनी मोदींवर यावेळी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज