Breaking : मोठी बातमी ! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात मोक्का दाखल

  • Written By: Published:
Breaking : मोठी बातमी ! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात मोक्का दाखल

MCOCA On Accused In Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर सात आरोपींविरोधात मोक्का दाखल करण्यात आला आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, प्रतिक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे, सिद्धार्थ सोनावणे या सात जणांविरोधात मोक्का दाखल करण्यात आला आहे. (MCOCA) मात्र, यात या सर्व कारवाईत वाल्मिक कराडचे नाव घेण्यात आलेले नाही.

वाल्मिक कराडवर मोक्का नाही

संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतो आहे. पण वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही. म्हणून वाल्मिक कराडला मोक्का लावलेला नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एसआयटी आणि सीआयडीकडे दिला आहे. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी राज्यसभरात मोर्चे निघत आहेत. सध्या राज्यात बीडमधील या हत्याकांडावरुन राजकारण तापलं आहे.

कायदा म्हण्जे काय आणि कुणावर लागू होतो ?

संघटित स्वरुपाची गुन्हेगारी असेल तर मोक्का लागतो. एका व्यक्तीवर मोक्का लागत नाही. मोक्का लावताना गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेतली जाते. गुन्ह्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजेच टोळी असेल तर मोक्का लागतो. अपहरण, खंडणी, हत्या, अमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का लावला जातो. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजे मोका आहे. 1999 हा संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारतातील राज्य सरकारने लागू केला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube