देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅकमध्ये चालवा, आरोपींना तात्काळ फाशी द्या; धनंजय मुंडे
Santosh Deshmukh Murder Case Should Investigated In Fast Track Court : संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणाचा तपास फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी, अशी मागणी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलीय. देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडले जात आहे. दरम्यान त्यांचं मोठं वक्तव्य समोर आलंय. अशातच गहिनीनाथ गड येथे आयोजित सभेतील भाविकांना मार्गदर्शन न करता धनंजय मुंडे केवळ शासकीय महापूजा करून पुढे मार्गस्थ झाले आहेत. देशमुख हत्या प्रकरणाचा तपास फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी, अशी मागणी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) करत आहेत.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वाळू उपसा करणाऱ्यांना अभय; म्हणाले, ही सगळी आपलीच…
बीडच्या पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ यांचा 49 वा पुण्यतिथी सोहळा साजरा होतोय. मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. प्रत्येक वर्षी मुंडे बहीण-भाऊ या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावतात. यंदा मात्र पंकजा मुंडेंची या कार्यक्रमास उपस्थिती नाही. पूजा करून पुढे मार्गस्थ झाले आहेत. धनंजय मुंडे दरवर्षी पुण्यतिथी सोहळ्याला हजेरी लावतात. यंदाही त्यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली आहे.
मी याबाबतीत काहीही उत्तर देणार नाही कृपा करून मला याबाबत प्रश्न विचारू नका. मी स्पष्ट सांगितले आहे, स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे हत्यारे आहेत. ज्यांनी निर्घृण पणे हत्या केली, त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात केस लढवून तात्काळ फाशी द्यावी. त्यामुळे मला वाटत नाही. कुणी काय म्हणावं, हा विषय वेगळा आहे. मात्र न्युज व्हॅल्यू करायची, या सगळ्या गोष्टी आहेत. केस अतिशय व्यवस्थितपणे तीन स्तरावर आहे. पोलीस व्यवस्थित तपास करत आहे. त्या यंत्रणेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, असं धनंजय मुंडे म्हणालेत.
यल्लापुरा महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रक दरीत कोसळला; 10 ठार, 15 जखमी
शेतकऱ्यांसाठी आणि दोन वेळेस एक रूपयाची योजना राज्यात आणली. राज्याचे केंद्राचे आणि शेतकऱ्यांचे पैसे देखील सरकारने दिले. आठ हजार नऊशे कोटी रूपये शेतकऱ्यांना वाटले. त्यावेळेस शेतकरी अडचणीत येत आणत असताना, मीच पीकविमा आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पीकविम्या शिवाय वेगळ्या पर्यायाचा विचार सुरू असल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलंय.