“आता मलाही मोकळं करा”, फडणवीसांनंतर CM शिंदेंच्या मंत्र्याची राजीनाम्याची तयारी

“आता मलाही मोकळं करा”, फडणवीसांनंतर CM शिंदेंच्या मंत्र्याची राजीनाम्याची तयारी

Maharashtra Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागले. या निवडणुकीत महायुतीची मोठी पिछेहाट झाली. भाजपला तर दोन आकडी संख्याही गाठता आली आहे. अजित पवार गट आणि शिंदे गटाचीही अवस्था फारशी चांगली नव्हती. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी केली. यानंतर आता अशीच विनंती शिंदेंच्या मंत्र्यांने केली आहे. फडणवीसांप्रमाणेच मलाही मोकळं करा, अशी विनवणी राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

राज्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट; तुर्तास राजीनामा देऊ नका; शाहंच्या फडणवीसांना सूचना

लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातील पाटन विधानसभा मतदारसंघात महायुती उमेदवाराला जास्त मते मिळाली नाहीत. परंतु, उदयनराजे जिंकले तरी घटलेल्या मताधिक्यामुळे मंत्री देसाईंचा एक प्रकारे पराभव झाला. मंत्रि‍पदामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात सत्ता जाऊन त्यांनी सूज आणि सुस्ती आल्याने मताधिक्य घटले ही माझी जबाबदारी आहे, असे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी निराश केले. त्यामुळे आता मी त्यांना विनंती करतो की मला मंत्रि‍पदाच्या जबबादारीतून मोकळं करा. दौलतनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात देसाई यांनी भावना व्यक्त केल्या. मंत्री देसाई सातारा जिल्ह्यातील पाटन विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर देसाईंनीही त्यांना साथ दिली होती.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात देसाई यांनी वित्त आणि योजना, महसूल विभाग आणि गृहराज्य मंत्रि‍पदाची जबाबदारी सांभाळली होती. सध्या देसाई महायुती सरकारमध्ये सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री आहेत. महायुतीच्या निराशाजनक कामगिरीची जबाबदारी देसाई यांनीही घेतली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री देसाई यांच्या विनंतीवर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महायुतीला धोक्याची घंटा! लोकसभा निवडणुकीत ‘164’ विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘मविआची’ सरशी

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो.  तसंच, मला आता सकारमधून मोकळ करा अशी विनंती मी भाजपच्या पक्ष नेतृत्वाकडे करणार आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निकालाच्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदते बोलताना दिली होती. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा झटका बसला. त्यातही भाजपाची मोठी पिछेहाट झाली. याची जबाबदारी घेत फडणवीसांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज