Video: संख्याबळ आणि भाजपचं संघटन पाहून विधासभेला जागा मिळाव्यात, राम शिंदेंची सूचक प्रतिक्रिया
Ram Shinde : जिथे संख्या जास्त आहे ज्या ठिकाणी, भाजपचं पक्ष संघटन मजबूत आहे, त्या जागा भाजपला मिळाला पाहिजेत अशी भावना भाजप विधान परिषद आमदार राम शिंदे यांनी बोलून दाखवली आहे. (Ram Shinde) ते माध्यमांशी बोलत होते. तसंच, त्यांनी यावेळी येणाऱ्या विधानसभेवरही भाष्य केलं आहे.
पवार इस द पावर, नाद करू नका अन्यथा, लंकेंचा थेट राम शिंदेंना इशारा
आज फक्त माझीच नाही तर भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे की काही जागांमध्ये बदल झाला पाहिजे. गेली अनेक दिवसांपासून कार्यकर्ते पक्षात काम करत असतात. त्यांनाही वाटत काही गोष्टी आपल्याला हव्यात तशा व्हायला हव्या आहेत. त्यामुळे या गोष्टींचा नक्कीच पक्षश्रेष्ठींनी विचार करायला पाहिजे असंही राम शिंदे यावेळी म्हणाले आहेत.
महायुतीमध्ये आता तीन पक्ष एकत्र आहेत. त्यामध्ये काही मतभेद आहेत का? त्यावर आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. जर तसं काही असेल तर पक्षनेतृत्व हे मतभेद दूर करतील आणि महायुती एकत्र निवडणुका लढेल असंही ते म्हणाले आहेत. त्याबरोबर त्यांनी यावेळी नवनिर्वाचित खासदार यांचा बोलण्याचा जो रोख होता. तो नेमका कुणाच्या संदर्भात होता हे तपासण्याची गरज आहे. बोलताना त्यांनी माझा नामोल्लेख त्यांनी केला असेल तर 2019 लाच मी त्यांचा नाद केला आहे असा टोलाही राम शिंदे यांनी यावेळी लगावला आहे.
केजसाठी पवारांनी हेरलाय भाजपचाच शिलेदार; माजी आमदार ठोंबरे राष्ट्रवादीच्या वाटेवर..
भाजपने राम शिंदे यांना विधानपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून आमदारकीची संधी दिलेली आहे. दरम्यान, ते आता कर्जत जामखेडमधून रोहित पवारांच्या विरोधात उमेदवार असतील अशी शक्यता आहे. गेल्यावेळी त्यांचा याच जागेवरून पराभव झालेला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काहीसे बाजूला पडलेल्या राम शिंदेंना भाजपने विधान परिषदेच्या माध्यमातून संधी दिलेली आहे.
येणाऱ्या विधानसभेला जागांमध्ये बदल, संघ्या जास्त, संघटन मजबूत त्या ठिकाणी भाजपला जागा मिळावी अशी प्रतिक्रिया भाजप आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केली. #Ramshinde #bjpmaharashtra #assemblyelection2024 pic.twitter.com/dedz0cbivJ
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 4, 2024