डान्सबार चालवत असलेला शंतनू कुकडे, अजितदादांचा पदाधिकारी नाहीच! प्रकरणात नवीन ट्वि्स्ट

डान्सबार चालवत असलेला शंतनू कुकडे, अजितदादांचा पदाधिकारी नाहीच! प्रकरणात नवीन ट्वि्स्ट

Shantanu Kukde Not Ajit Pawar office bearer : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. राष्ट्रवादीचा पदाधिकारी एका बंगल्यात डान्सबार चालवत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. शंतनू सॅम्युएल कुकडे (Shantanu Kukde) असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या पदाधिकाऱ्याचं नाव होतं. तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला होता की, मुलींचे धर्म परिवर्तन करण्यासाठी शंतनुला इंटरनॅशनल फंडिंग येते. याप्रकरणी शंतनू कुकडेवर समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा (Pune News) देखील दाखल झालाय. त्यानंतर अजित दादा आणि त्यांच्या पक्षाला विरोधकांनी घेरलं होतं. मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळातून टीका होत होती. दरम्यान आता शंतनू कुकडे राष्ट्रवादीचा पदाधिकारीच नसल्याचं समोर येतंय.

शंतनू कुकडे राष्ट्रवादीचा पदाधिकारीच नसल्याचं समोर येतंय. शंतनुने 26 डिसेंबर 2024 रोजीच सदस्य आणि उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, अशी माहिती मिळतेय. राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा सोपवला होता. मानसिक स्थिती चांगली नसल्याचे कारण देत शंतनू कुकडे याने राजीनामा दिला होता. माझ्या कामाचा व्याप जास्त वाढल्याने माझी तब्येत खालावली आहे. त्यामुळे (Pune Politics) तसेच मानसिक स्थिती चांगली नसल्याकारणाने मला पक्ष कार्यासाठी जास्त वेळ देता येत नाही. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असं देखील शंतनू कुकडे यानी म्हटलं होतं. काल पुण्यात शंतनू कुकडे याच्यावर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. तर पोस्कोच्या गुन्ह्यात कुकडे याला अटक करण्यात आली आहे.

Video : आता हिंदू जागे झालेत; ‘वक्फ’ विधेयकाबाबत आभार मानत ठाकरेंनी सांगितली भाजपची चाल

रविंद्र धगेकर यांनी काय म्हटलं?

दोन दिवसांपूर्वी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये शंतनू कुकडेवर गुन्हा दाखल झाला, तो राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. नेत्यांसोबत वावर आहे. काल मी एक ट्विट केलं, त्यात मी माहिती घेतली तो क्लब चालवत होता. लहान मुलींना अनैतिक संबंध ठेवण्याच्या तक्रारी आहेत. या ठिकाणी अनेक राजकीय लोक पोलीस अधिकारी शासकीय लोकांचा वावर होता. महिला आयोगाला पत्र दिलंय. त्यांनी याबाबत चौकशी करायला सांगितले आहे.

तो धर्मांतर करायला लावतो. अनेक लोक त्याच्यासोबत काम करत आहेत. करोडो रुपये यांनी जमवले आहेत. तो अनेक धंदे करतो, याचा तपास पोलिसांनी का केला नाही? त्याच्यासोबत राजकीय लोक असतात. अजितदादांना विनंती करणार आहे, त्यांनी पक्षातून अशा लोकांना काढून टाकावे, कारवाई करावी. काल पोलिसांना याविषयी माहिती दिलीय, याला जरब बसवली पाहिजे. समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गीते यांच्याकडून तपास काढला पाहिजे.

कामाची बातमी! राज्यात १ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’; घरात बसून करता येणार रजिस्ट्री

पोलिस गुन्हा लपवत आहेत का? असा प्रश्न आहे. प्रदेशातून पैसे येतात इथे खर्च केला जातो, तर याचा तपास झाला पाहिजे. पोलीस आयुक्तांना पत्र लिहून हा तपास सिनियर पोलिस अधिकारी याच्याकडून काढून घ्यावा, सक्षम अधिकारी द्यावा. शंतनू कुकडे याची बॅंक खाती तपासली पाहिजे. हा दादा गटाचा पदाधिकारी आहे. त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या पण चौकशी कराव्या, अशी मागणी त्यांनी केलीय.

पुण्यातील पूर्ण दादा गट सोबत होता का? याचा तपास करावा, अजित दादांनी कारवाई करावी, याचा सखोल तपास झाला पाहिजे. पोलीस प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी किती रक्कम दिली आहे, याचा तपास करावा. एक कोटी रुपये वाटले आहेत. धर्मांतर आकडा किती आहे, पैसे किती आहेत, याचा तपास पोलिसांनी केला असल्याचं धंगेकरांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे शिवसेना स्पेशल भूमिका

राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदाधिकारी शंतनू कुकडे याने पुणे शहरातील नाना पेठ येथे मुलींना सोबत घेऊन डान्सबार सुरू केला आहे. त्यामधील एका मुलीवर अत्याचार केल्याचा शंतनू कुकडेसह पाच जणावर गुन्हा समर्थ पोलीस स्टेशन येथे दाखल झाला आहे. पिडीत मुलीवर दबाव असताना पण तिने धाडस दाखवून गुन्हा दाखल केला. शंतनुला तीन दिवसापूर्वी अटक झाली असून पुढील तपास चालू आहे, पीडित मुलीला संरक्षण देण्यात यावे, तिच्यावर दबाव टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या शंतनुच्या परदेशातून त्याच्या बँक खात्यावर रसद येते. गोरगरीब जनतेला आमिष दाखवून त्यांचे मत परिवर्तन करत असतो, अशी आमची माहिती आहे.

स्थानिक लोकांना रात्री दोन तीन वाजेपर्यंत स्पीकर लावलेले असतात त्याचा त्रास होतो, म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे, विभाग प्रमुख राजेश मोरे, मुकुंद चव्हाण, राहुल जेकटे, अजय परदेशी, युवराज पारिख, राहुल आलमखाने, रमेश परदेशी, शैलेश जगताप, महिला आघाडीच्या रोहिणी कोल्हाळ, गौरी चव्हाण, निकिता मारटकर, पद्मा सोरटे, स्वाती कथलकर, स्मिता पवार यांनी समर्थ पोलीस स्टेशन येथे आणि नाना पेठेत ज्या ठिकाणी डांसबार चालू होता, जिथे मुलीवर अत्याचार झाला त्या ठिकाणी धडक दिली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube