शिवरायांचा विचार घेऊन जरांगे पुढे येत असतील तर…; बीडच्या सभेत पवारांचं मोठं विधान

शिवरायांचा विचार घेऊन जरांगे पुढे येत असतील तर…; बीडच्या सभेत पवारांचं मोठं विधान

Sharad Pawar beed Sabha : छत्रपती  शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन मनोज जरांगे पुढे जात असतील किंवा आणखी कोणी पुढे येत असेल तर त्या ऐक्याच्या विचाराला आपण सर्वांना सहकार्य केलं पाहिजे, असं विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं.

‘मत दिलं नाहीतर पंकजा मुंडेंना साताऱ्यातून निवडून आणेन’ बीडकरांसमोर उदयनराजे भोसलेंची मोठी घोषणा 

आज बीडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आज सभा झाली. या सभेला संबोधित करतांना शरद पवार म्हणाले की, शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन मनोज जरांगे पुढे जात असतील किंवा आणखी कोणी पुढे येत असेल तर त्या ऐक्याच्या विचाराला आपण सर्वांना सहकार्य केलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांचे धोरण काय? हे समजून घेण्यासाठी मी आणि राजेश टोपे जरांगेंना भेटलो. त्यांना विनंती केली की, या राज्यात कोणताही जाती-धर्माचा असो त्या सर्वांना सोबत घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेवू, असं आव्हान शरद पवारांनी केलं.

Rajkumar Rao च्या श्रीकांतची दमदार सुरूवात; पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई 

पुढं बोलतांना पवार म्हणाले, बीड हा अतिशय दिलदार लोकांचा जिल्हा आहे. क्रांतीसिंह नाना पाटील यांना या जिल्ह्याने एकदा विजयी केले. नाना पाटील हे सातारा जिल्ह्यातील होते. उभे राहिले बीड जिल्हात. या जिल्ह्यातील जनतेने त्यांना निवडून दिलं. बीड जिल्ह्यात आमचेही सर्व आमदार निवडून आले. त्यानंतर मी दिल्लीला गेलो आणि आठ दिवसांत 71 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. याचा फायदा देशातील सर्व राज्यांना झाला. ही कर्जमाफी संबंध देशातील लोकांना मिळाली. आज काय स्थिती आहे?, असा सवाल पवारांनी केल

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या दहा वर्षांत शेतकरी, महिला, नोकरदार आणि गरीबांवर अन्याय करण्य़ाचं काम केलं. शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली, मात्र केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. या सरकारना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कधीही आस्था वाटली नाही. निवडणुकीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मोदी सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचा हिसका काय असतो हे या सरकारला दाखवून द्या, असं आवाहन पवारांनी केलं.

देशाच्या पंतप्रधानांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. केवळ मोदींवर टीका केल्यानं सरकारने ही अटक केली. सत्तेचा दुरुपयोग आणि सत्तेची गुर्मी हेच धोरण मोदी सरकारचे आहे, असंही पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube