शिंदे -फडणवीस सरकारची वर्षपूर्ती : ‘इतना सन्नांटा क्यू है भाई…’
Eknath Shinde and Devendra Fadanvis Complete 1 year Goverment : सेलिब्रेशन , इव्हेंट आणि जाहिरात या सर्व माध्यमातुन शिंदे – फडणवीस सरकार सतत चर्चेत राहिले. या सरकारचे काही इव्हेंट तर डोळे दीपावणारे होते. सरकार स्थापन झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महारष्ट्र दौरा असो, समृद्धी महामार्ग उद्घाटन , रायगड सोहळा, महारष्ट्र भूषण पुरस्कर असो , शासन आपल्या दारी हे सरकारी कार्यक्रम भव्यदिव्य केले . केवळ सरकारचे नव्हे तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना या आपल्या पक्षाचे कार्यक्रम देखील भव्य दिव्य केले.( Eknath Shinde and Devendra Fadanvis Complete 1 year Goverment ) आयोध्य दौरा असो, दसरा मेळावा असो की शिवसेना वर्धापन दिन असो एकनाथ शिंदे यांनी एकही कार्यक्रम भव्य दिव्य करण्याची संधी सोडली नाही.
याच सरकारची वर्षापुर्ती आज तीस जून रोजी होत आहे. या दिवशी अनेक कार्यक्रम होतील अशी अनेकांना आशा होती. हा दिवस भव्यतेने साजरा होणार असे वाटत होते. पण ना शिवसेनेकडून ना भाजपकडून आज वर्षपुर्ती दिवस साजरा केला गेला नाही. ना पक्षाचे आमदार अथवा मंत्री यांनी याविषयी आनंद साजरा केल्याचे दिसले नाहीत. सातारा येथे शंभुराज देसाई यांनी मतदार संघाच्या विकामाचे उद्घाटन ठेवले या पलिकडे काही नाही.
गुगली नक्की कोणाची? विकेट कुणाची ? पवार आणि फडणवीस पुन्हा भिडले !
रात्री उशिरा दिल्लीहून मुंबईत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी ठाण्यात एका छोटेखानी कार्यक्रमात केक कापला . हा अपवाद वगळता आनंदाचे कुठलाही क्षण साजरा झाल्याचे दिसत नाही. एवढंच काय तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्याचे संदेश देखील दोन्ही कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले नाही. मुख्यमंत्री मुंबईत आपल्या कार्यक्रमात व्यस्त होते तर उपमुखमंत्री बीड येथे राजकीय कार्यक्रमाला निघून गेले.
आज शिंदे सरकारची वर्षपुर्ती असताना शिवसेनेच्या बाळासाहेब भवन येथे सन्नाटा पहायला मिळत आहे. @mieknathshinde @ShrikantShinde pic.twitter.com/4AjxJ7llkA
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 30, 2023
आज शिंदे सरकारची वर्षपुर्ती असताना शिवसेनेच्या बाळासाहेब भवन येथे सन्नाटा पहायला मिळत आहे. @mieknathshinde @ShrikantShinde pic.twitter.com/4AjxJ7llkA
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 30, 2023
मंत्री आपापल्या कामात व्यस्त आहेत. मंत्रालय, मंत्री बंगले, भाजप पक्ष कार्यालय, बाळासाहेव भवन या सर्वच ठिकाणी चिडीचूप शांतता आहे. दिवसभर तुरळक वर्दळ वगळता सन्नाटा दिसून आला. नक्की वर्षपूर्ती झाली असताना ही शांतता का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कालचा मुख्यमंत्री यांचा दिल्ली दौरा याला कारणीभूत आहे का ? शिवसेना भाजपा मध्ये कुरबुरी याला कारणीभूत आहेत का ? असे देखील प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच ही वादळापूर्वीची शांतता आहे का? काहीही असलं तरी सरकारच्या वाढदिवसाच्या दिवशी एकच चर्चा होती “ इतना संन्नाटा क्यू है भाई”……