गगराणींचा २ लाख ६२ हजार तर त्यांच्या शिपायाला ४८ हजार पगार; …म्हणून कडूंनी सभागृहात सांगितला आकडा

  • Written By: Published:
गगराणींचा २ लाख ६२ हजार तर त्यांच्या शिपायाला ४८ हजार पगार; …म्हणून कडूंनी सभागृहात सांगितला आकडा

भूषण गगराणी यांचा पगार २ लाख ६२ हजार १९७ रुपये जाधव ४८,५६० रुपये आहे आणि अपंगाला १५०० रुपये महिना निधी देण्यात येत आहे. ही दुर्दवाची बाब आहे अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी आज विधिमंडळात केली. त्यामुळे ही इंडिया विरुद्ध अशी भारत अशी लढाई आहे. यात इंडिया जिंकला भारत हरला अशी खंतही त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना त्यांनी त्यांची मते मांडली.

यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की ज्याला दोन पाय नाहीत, दोन हात नाहीत किंवा ज्याला डोळा नाही. त्याला काहीच कळत नाही. अशा व्यक्तीला फक्त १५०० रुपये निधी दिला जात आहे. किमान वेतन ठरवताना आमदार, खासदार, अधिकाऱ्यांचा किमान वेतन १८,००० हजार रुपये आहे, पण गरिबांना काय दिलं जात आहे. पुढल्या वेळी धोरणे ठरवताना सामान्य लोकांचा विचार केला जावा अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी सभागृहात केली.

Nitesh Rane : राज ठाकरेंनी सांगितलेलं खरंय, जो माणूस वडिलांना धमकी…

१५ वर्षाचा लढा कामकाजावर

सभागृहाच्या कामकाजावर दिव्यांग मंत्रालय असा उल्लेख आला तेव्हा आमचा १५ वर्षाचा लढा कामकाजावर आला. जर सरकार बदललं नसतं तर हे दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं नसत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं आभार मानतो. असं म्हणत बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले.

दरम्यान आज विधिमंडळाच्या आवारात कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्याचा प्रकार घडला ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, ही महाराष्ट्राची परंपरा नाही असे सांगतानाच रस्त्यावर लोक जे काही करतात तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो. परंतु विधीमंडळ कार्यक्षेत्रात असा प्रकार घडता कामा नये अशा स्पष्ट शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.

Sudhir Mungantivar : सांगितलं होतं झाडाला फळ येतील, पण झाडाशीच नातं तोडलं…

सत्ताधाऱ्यांना तंबी देत ते म्हणाले, अशा प्रकारच्या घटना कुठल्याही परिस्थितीत विधीमंडळाच्या परिसरात दोन्ही सभागृहाच्या सदस्यांकडून घडता कामा नये आणि ते घडू नये म्हणून तातडीने पाऊले विधानसभा अध्यक्षांनी व मुख्यमंत्र्यांनी उचलली पाहिजे. आजच्या जोडे मारण्याच्या घटनेचा तीव्र निषेधही त्यांनी नोंदवला.

ते म्हणाले, अधिवेशन व्यवस्थित चालावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आलो आहोत. आतापर्यंत अधिवेशन व्यवस्थित सुरू होते. मात्र आज विधानभवनाच्या पायर्‍यांवर सत्ताधारी एक बॅनर घेऊन बसले होते. त्यावर राहुल गांधी यांचा फोटो होता. त्या फोटोला जोडे सत्ताधारी आमदार विधीमंडळाच्या कार्यक्षेत्रात मारत होते. हे विधीमंडळ अध्यक्ष व सभापती यांच्या अखत्यारित येते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube