एसटी कर्मचाऱ्यांनी ‘लाल’परीचं ब्रेक सोडलं; CM शिंदेंच्या बैठकीनंतर तोडगा निघाला…

एसटी कर्मचाऱ्यांनी ‘लाल’परीचं ब्रेक सोडलं; CM शिंदेंच्या बैठकीनंतर तोडगा निघाला…

ST Bus Strike : दोन दिवसांपूर्वी एसटी महामंडळाकडून (ST Bus Strike) पुकारण्यात आलेला संप अखेर मागे घेण्यात आला असल्याची माहिती समोर आलीयं. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरच एसटी महामंडळाने संप पुकारल्याने राज्यभरातून प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता. तर दुसरीकडे मनधरणी करण्यासाठी गेलेले मंत्री उदय सामंत यांचीही बैठक निष्फळ ठरल्याचं दिसून आलं. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर एसटी महामंडळाकडून संप मागे घेण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 5000 रुपयांची वेतनात वाढ करण्याची मागणी केली होती. पण सरकारने तब्बल 6500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Marathi Movie: विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय, ‘या’ दोन चित्रपटामुळे वारं फिरणार?

विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळाने संप पुकारला होता. यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात भरघोस वाढ करण्याची प्रमुख मागणी होती. कृती समितीसह एसटीच्या संघनांकडून हा संप पुकारण्यात आला होता. काल राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू राज्याच्या दौऱ्यावर असल्याने मुख्यमंत्री शिंदेंशी एसटी महामंडळ कृती समितीची बैठक होऊ शकली नाही. मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर अखेर संप मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा थोड्यात वेळात केली जाणार असल्याची माहिती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी दिलीयं.

“शरद पवार, आपसे बैर नही लेकीन समरजीत तेरी..” मुश्रीफांचा नारा अन् टार्गेटही ठरलं!

एसटी कर्मचाऱ्यांना मूळ पगारामध्ये साडेसहा हजारांनी वाढ देण्यासाठी सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. हीच प्रमुख मागणी असल्याने सर्वच कर्मचाऱ्यांनी आता कामावर रुजू व्हावे, संप मागे घेणार असल्याची घोषणा कृती समितीकडून थोड्याच वेळात करण्यात असल्याचंही पडळकर यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube