प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या कार्यक्रमाला दांडी मारणे महागात; पुण्यात भाजपच्या शंभर नगरसेवकांना नोटीस…

bjp corporators Ravindra Chavan event भाजपच्या पुण्यातील संघटनात्मक शिस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Ravindra Chavan BJP Program

State President Ravindra Chavan’s event in Pune skipped; party issues notices to Hundred corporators : भाजपच्या पुण्यातील संघटनात्मक शिस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रचार कार्यक्रमाला पक्षाच्या शंभरहून अधिक नगरसेवकांनी अनुपस्थिती दर्शवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराची पक्षाकडून गंभीर दखल घेतली जात असून, गैरहजर नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त आहे.

उंच स्वप्नांची गगनभरारी आणि निष्पाप बालपणाचा अनोखा प्रवास,‘चिकीझिंग’चा हृदयस्पर्शी व लक्षवेधी टिझर प्रदर्शित!

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे आणि डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचाराचा प्रारंभ शनिवारी करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे आणि पक्षातील अन्य प्रमुख नेते उपस्थित होते. पक्षाकडून नगरसेवकांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात असल्याचे सांगितले जाते. मात्र असे असतानाही मोठ्या संख्येने नगरसेवक गैरहजर राहिल्याने आता नगरसेवकांची मोठी पंचायत झाली आहे.

‘आदि अनंत’मधून उलगडणार ‘आजोबा -नातवाच्या गोड नात्याचे भावविश्व

नगरसेवकांच्या अनुपस्थितीची बाब लक्षात आल्यानंतर महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नगरसेवकांची नोंद घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. काही नगरसेवक कार्यक्रमस्थळी आले होते; मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच ते निघून गेल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या नगरसेवकांची माहिती घेतली जात आल्याचे सांगितले जात आहे. आता गैरहजर राहिलेल्या नगरसेवकांकडून स्पष्टीकरण मागवले जाणार आहे. त्यांच्या उत्तरांनंतर पक्ष काय भूमिका घेतो, याकडे लक्ष लागले आहे.

सुशिक्षित बेरोजगाराची धमाल गोष्ट उलगडणार! अंकुर वाढवेला लागली ‘कोलंबस”ची लॉटरी!

पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर सात स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती झाल्याने पक्षाचे संख्याबळ १२६ वर पोहोचले आहे. एवढे मोठे संख्याबळ असतानाही प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीतील महत्त्वाच्या कार्यक्रमाला नगरसेवक अनुपस्थिती राहिल्याने पक्षातील समन्वय आणि संघटनात्मक शिस्तीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहण्यामागे नगरसेवकांची नेमकी कोणती कारणे आहेत, हे त्यांच्या खुलाशानंतर स्पष्ट होईल मात्र सध्यातरी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर पक्षाकडून कोणती कारवाई केली जाणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महागाईने खिसा रिकामा, नोकरीवरही संकट! महागाईला लगाम का लागत नाही? नोबेलविजेत्यांनी उलगडलं गणित

दरम्यान, शिस्तीसाठी भाजप पक्ष ओळखला जातो मात्र पुणे भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्थानिक नेत्यांमध्ये समन्वय नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुणे भाजपमध्ये नेमक चाललंय काय? यावर आता चर्चा रंगायला सुरु झाल्या आहेत. या प्रकरणी नगरसेवकांना फक्त इशारा दिला जाणार की प्रत्यक्ष कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us