जनतेच्या पाठिंब्याने माझ्याकडे पद, कुणाच्या मेहेरबानीने नाही; सुनील तटकरेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर
Sunil Tatkare On Rohit Pawar : जनतेच्या पाठिंब्याने माझ्याकडे पद, कुणाच्या मेहेरबानीने नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे
Sunil Tatkare On Rohit Pawar : जनतेच्या पाठिंब्याने माझ्याकडे पद, कुणाच्या मेहेरबानीने नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना प्रत्युत्तर दिले आहे. अशोक खरात प्रकरणात एक्सवर पोस्ट करत रोहित पवार यांनी रुपाली चाकणकर यांच्याकडे असणारे दोन्ही पदे गेली मात्र सुनील तटकरे यांच्या घरी आज आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपद आहे अशी टीका सुनील तटकरे यांच्यावर नाव न घेता केली होती. तर आता या टिकेला प्रत्युत्तर देत जनतेच्या पाठिंब्याने माझ्याकडे पद असून कुणाच्या मेहेरबानीने पद मला मिळाले नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले की, मी लोकसभा निवडणुकीत निवडून आलो असून सध्या लोकसभेचा सदस्य आहे. माझ्याकडे कोणतेही पद आलेले नाही. स्वतःच्या ताकदीने आणि जनतेच्या पाठिंब्याने मला पद मिळाले आहे. मी पाच वेळा विधानसभेत निवडून आलो आहे. 1992 साली मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. अदितीही दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकून आली आहे. आम्ही कुणाच्याही मेहेरबानीने निवडून आलेलो नाही, असं सुनील तटकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, मी कुणासोबतही कामाख्या देवीला गेलो नव्हतो. आम्ही मिळवलेले यश काहींना पाहवत नाही. ज्यांची जनतेने नैराश्य केली त्या नैराश्यातून आमच्यावर काही व्यक्तींकडून आरोप केले जात आहेत असं देखील माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले.
मोठी बातमी! मोदी सरकारमधील चार मंत्र्यांना द्यावा लागणार राजीनामा; नेमकं कारण काय
नेमकं काय म्हणाले रोहित पवार ?
सत्तेतील तिन्ही घटक पक्षातील नेत्यांचा खरात प्रकरणात थेट संबंध असूनही आतापर्यंत त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीला टार्गेट करण्यात आलं.. टार्गेट केलेल्या या व्यक्तीसोबत असलेली दुसरी व्यक्ती राजकीयदृष्ट्या अधिक वजनदार असूनही ते मात्र खरात (Ashok Kharat) प्रकरणातून नामानिराळे आहेत आणि आता तर खासदारकी आणि मंत्री पदापाठोपाठ विधान परिषदेची आमदारकीही स्वतःच्याच घरात ठेवली. माँ कामाख्या देवीला गेलेल्यांपैकी एका व्यक्तीची दोन्ही पदं गेली तर दुसऱ्याच्या घरात मात्र आधीच दोन-दोन पदं असताना आता तिसरंही आलं.. हा आहे महाराष्ट्रातला पॉलिटिकल गेम…!