‘गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन होणे हे गृहमंत्रायलाचे अपयश’; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा

  • Written By: Published:
‘गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन होणे हे गृहमंत्रायलाचे अपयश’; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा

Supriya Sule : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील सूत्रधार असल्याचा ठपका असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर मकोका (MCOCA) लावण्यात आला. त्यानंतर परळीमध्ये (Parali) बाजारपेठ बंद करण्यात आली. कराड समर्थक टॉवरवर चढले. त्यांनी मकोका ((MCOCA) मागे घेण्यासाठी आंदोलन सुरू केलं. यावर आता खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भाष्य केलं. वाल्मिक कराडवर गंभीर आरोप आहेत. असे असताना त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन होणे हे गृहमंत्रालयाचे (Ministry of Home Affairs) अपयश आहे, अशी टीका सुळेंनी केली.

सुनीता विल्यम्स करणार चमत्कार, 12 वर्षांनंतर अंतराळात होणार ‘स्पेसवॉक’! 

सुप्रिया सुळेंनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, बीड आणि परभणीमध्ये जे काही घडलंय, त्यावर गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत, त्यांनी बीडमधील संतोष देशमुख आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणांत लक्ष घातलं पाहिजे. त्यांनाच यासंबंधी प्रश्न विचारले पाहिजे. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा होता. अनेक नेत्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामे दिले होते, असं सुळे म्हणाल्या.

अनुष्का शेट्टीच्या ‘घाटी’ चित्रपटात विक्रम प्रभूची एंट्री, दिसणार देसी राजूच्या भूमिकेत 

परळी आणि बीडमध्ये मंगळवारी गुंडांना सोडण्यासाठी टायर जाळण्यात आले, लोक टॉवरवर चढले, दुकाने बंद करण्यात आली. हे महाराष्ट्रात काय चाललंय, गृहमंत्री काय करत आहेत? असा सवाल सुळेंनी केला. वाल्मिक कराडवर गंभीर आरोप आहेत, असं असतांना त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन होणं हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे, अशा शब्दात सुळेंनी फडणवीसांवर निशाणा साधला.

‘देशमुख, राऊतांना ईडी लावता, मग कराडला का नाही?’
त्या म्हणाल्या की, वाल्मिकी कराड याच्या मालमत्तेबद्दल दररोज वेगवेगळी माहिती बाहेर येत आहे. त्यामुळे वाल्मिकी कराडचे किती अकाऊंड सील केले आणि त्यात किती पैसे होते? याची माहिती समोर येणं आवश्यक आहे. यापूर्वी, ऐकीव माहितीवर ईडीने अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ आणि इतर नेत्यांवर ईडी लावली. मात्र, वाल्मिकी कराडवर गुन्हा नोंद असूनही ईडी का लावली जात नाहीये? असा सवाल सुळेंनी उपस्थित केला आहे.

पुढं बोलताना सुळे म्हणाल्या की, वाल्मिक कराडवर मकोका लावला याबद्दल सरकारचे अभिनंदन. देर याये दुरूस्त आये. पण खंडणीचे प्रकार थांबायला हवे. असेच होत राहिले तर राज्यात गुंतवणूक कशी येईल?, असा सवाल त्यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube