महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला; इव्हेंटजीवी सरकार आहे, शिवरायांच्या पुतळ्यावरून जयंत पाटालांची टीका

महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला; इव्हेंटजीवी सरकार आहे, शिवरायांच्या पुतळ्यावरून जयंत पाटालांची टीका

Jayant Patil on Shivaji Maharaj statue : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना (Jayant Patil) तुम्ही काळजी घेत नाही. टेंडर न काढता तुम्ही परवानगी काढता. हे कस झालं? याची सखोल चौकशी होऊन कारवाई होणं गरजेच आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

Shivaji Maharaj Statue: मोठी बातमी! शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे फरार

आम्ही पुतळा पाडल्यावर बोलत आहोत. जर या अगोदर येथील दोन फरशा पडल्या तेव्हा बोललो असतो तर आमच्यावर काय आरोप केले असते? असं म्हणत हे इव्हेंटजिवी सरकार आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे. या पुतळ्याचं काम देणारा पकडला पाहिजे अशी मागणी करत त्यांना काम देणारा कोण आहे याचाही शोध घेतला पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. सरकारकडून दोन्ही आपटेंना वाचवण्याचं काम सुरू आहे.

आता सिंधुदुर्गात १०० फुटांचा पुतळा उभारू शिंदे गटाच्या मंत्र्याचं मोठं विधान

काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा केला होता. नौदलाच्या अख्त्यारित असणारं काम बांधकाम खात्याने पुढाकार घेऊन केलेलं होतं. आठ महिन्यात फारसा वारा, वादळ नसताना हा पुतळा कोसळला. मुख्यमंत्री म्हणतात ताशी 45 किमी वेगाने वारे वाहत होते. माझ्या माहितीप्रमाणे ताशी 27-28 किमी वाऱ्याचा वेग होता असा दावा जयंत पाटील यांनी यावेळी केला. एवढं मोठं वादळ असतं, तर दोन-चार झाडं पडली असती. पण असं न होता पुतळा पडला. याचा अर्थ पुतळ्याच काम सदोष होतं. पुतळ्याच स्ट्रक्चर कमकुवत होतं. याला कोण जबाबदार? याची चौकशी राज्य सरकारने केली पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.

आपटेचा पत्ता नेवीला कसा कळला?

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पुढाकारातून उभारण्यात आला होता. जयदीप आपटेचा पत्ता नेवीला कसा कळला? तो आपटे कल्याणचाच निघावा. यात नौदलाचा दोष नाही. महाराष्ट्र सरकारने जबाबदारी स्वीकारुन माफी मागावी असं जयंत पाटील म्हणाले. तसंच, इथले स्थानिक मंत्री सांगतात की, वाईटातून काही तरी चांगलं घडेल. मला अशा मंत्र्यांच्या बुद्धीची कीव वाटते. आता म्हणतात, आम्ही 100 फुटाचा पुतळा उभा करु. अहो, तुम्हाला 28 फुटाचा पुतळा उभारता आला नाही आणि तुम्ही 100 फुटाचं बोलता असंही जयंत पाटील म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube