खा. लंकेंना नडणाऱ्या तहसीलदार ज्योती देवरे पुन्हा अहिल्यानगरमध्ये! निवडणूक शाखेत नियुक्ती

Tehsildar Jyoti Deore back in Ahilyanagar : अहिल्यानगर (Ahilyanagar News) जिल्ह्यातील प्रशासकीय घडामोडी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. पारनेर तालुक्यात चार वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्याशी वाद झालेल्या तहसीलदार ज्योती देवरे (Tehsildar Jyoti Deore) यांची पुन्हा अहिल्यानगरमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नेमणूक महत्त्वाची मानली जाते.
निलेश लंके यांच्याशी चार वर्षांपूर्वी वाद
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात खासदार निलेश लंके यांच्याशी चार वर्षांपूर्वी वाद झालेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांची पुन्हा अहिल्यानगरमध्ये बदली झाली आहे. त्या जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेचे काम पाहतील. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समित्या अन् ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : जर कोणी दोषी नसेल, तर सहा जणांना कोणी मारलं? प्रकाश आंबेडकर संतापले
ऑडिओ क्लिप व्हायरल
खासदार नीलेश लंके यांच्याशी पंगा झालेल्या तहसीलदार ज्योती देवरे पुन्हा अहिल्यानगर जिल्ह्यात आल्या आहेत. आता त्यांची निवडणूक शाखेत नियुक्ती झाली आहे. चार वर्षांपूर्वी देवरे पारनेरला तहसीलदार होत्या. त्यावेळी त्यांचा तेव्हा आमदार असलेले लंके यांच्याशी पंगा झाला होता. त्यानंतर त्यांची जळगावला बदली झाली होती. वाळू आणि अन्य कारवाई अन् निर्णय यावरून वाद वाढत गेला. तेव्हा देवरे यांची आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.
ब्रेकिंग! ट्रम्पचा दणका तुर्तास टळला; भारताला टॅरिफसाठी 7 दिवसांची सूट
जळगावला बदली
यामध्ये महिला अधिकारी म्हणून काम करताना होणारा त्रास, वरिष्ठांचे दुर्लक्ष, लोकप्रतिनिधी यांचे वर्तन याबद्दल सविस्तर कथन केले होते. या क्लिपनंतर देवरे यांच्या विरोधातही तक्रारी करण्यात आल्या होत्या. देवरे यांनीही तक्रारी केल्या. त्याची चौकशी झाली होती. देवरे यांचे अनेकांनी उघड समर्थनही केले होते. नंतर त्यांची जळगावला बदली झाली. मधल्या काळात लंके खासदार झाले आहेत. तर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर देवरे यांची जिल्हा निवडणूक शाखेत नियुक्ती झाली आहे.