DCM Ajit Pawar : ही तर शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाण्याची सुरुवात; राऊतांचा हल्लाबोल

DCM Ajit Pawar : ही तर शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाण्याची सुरुवात; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Eknath Shinde and Ajit Pawar :   राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अन्य 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या घडामोडींवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले की,  हा भूकंप वगैरे काही नाही. काही गोष्टी राजकारणात घडणार होत्या. त्या घडलेल्या आहे. शिंदे- फडणवीस सरकारकडे 165 आमदारांचा पाठिंबा होता. तरीसुद्धा त्यांना अजित पवारांच्या 30-40 आमदारांची गरज भासली. याचाच अर्थ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र होणार आहेत. त्यानंतर उरलेले आमदार अपात्र होणार, असे राऊत म्हणाले.

Video : डबल इंजिन सरकारला अजितदादांचे तिसरे इंजिन; शिंदेंकडून राष्ट्रवादीचे सरकारमध्ये स्वागत

तसेच एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाण्याची ही सुरुवात आहे. म्हणून त्यांना हा टेकू घ्यावा लागला. यातील अनेक नेते असे आहेत, की ज्यांच्या विरुद्ध भाजपने मोहिम राबविली होती. हसन मुश्रीफ यांच्यापासून अनेकांवर भाजपने आरोप केले होते. त्यांचे भाजप काय करणार हा प्रश्न आहे. पण एकनाथ शिंदे हे फार काळ मुख्यमंत्री राहणार नाही, हे आजच्या शपथविधीने स्पष्ट केले आहे. माझं शरद पवार यांच्याशी सकाळी या विषयावर बोलणं झालं. ते खंबीर आहे. त्यांनी चर्चा केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचीही चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे नेते आम्ही सर्व पुन्हा महाराष्ट्रात उभे राहू असे राऊत म्हणाले.

Raj Thackeray : पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !

अजित पवार यांच्या सोबत असलेले आमदार –

दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे हे आमदार अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला उपस्थित होते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube