सोन-चांदीचे भाव गगनाला भिडले; 48 तासात चांदीच्या किमतीत 7000 तर सोन्याच्या किमतीत ‘इतकी’ वाढ
Gold and Silver Price : गेल्या महिनाभरापूर्वी सोन्या चांदीच्या भावात कपात झाली होती. मात्र, अमेरिकेतील अर्थव्यवस्था व फेडरल रिझर्व्ह बँकेने कमी केलेले व्याजाचे दर यामुळं दोनच दिवसात चांदीच्या भावात (Silver) प्रतिकीलो जवळपास 7 हजारांची वाढ झाली आहे. तर, सोन्याच्या भावातही (Gold) प्रति तोळा 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तज्ञांच्या मते गेल्या 1991 नंतर म्हणजे साडे तीन दशकांत अत्यंत कमी कालावधीत म्हणजे दोन दिवसात ही सर्वात मोठी वाढ आहे.
काल चांदीच्या दरात वाढ
काल चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काल एकाच दिवसात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेत चांदीच्या दरात (Silver) तब्बल 4400 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आलं आहे. संपूर्ण देशात खामगाव येथील चांदीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. आता खामगाव येथील बाजारपेठेत चांदी 91000 रू प्रति किलो तर सोने 75200 रू प्रति तोळे मिळत आहे. मात्र, ही दरवाढ दिवाळी पर्यंत स्थिरावेल अशी माहिती चांदीच्या व्यापाऱ्यांनी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही वाढ
एका बाजूला राष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असताना, दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं लोकांना सोन्याची खरेदी करणं परवड नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या काळात आमकी सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात मौल्यवान धातूंच्या (सोने आणि चांदी) किंमती वाढू शकतात, असे जाणकारांचे मत आहे.
Dhule Accident : पिकअप अन् ईकोचा अपघात, वाहनाचा चक्काचूर; पाच जण जागीच ठार
नवीन मागणी येऊ शकते
येत्या काही दिवसांत अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात केली जाऊ शकते, त्याचा फायदा सराफांना होऊ शकतो. लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात नवीन मागणी येऊ शकते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.