मुदतबाह्य अन्नपदार्थ विक्रीवर बंदी, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यगृहांसाठी नवीन आदेश; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून अॅक्शन मोडमध्ये असल्याने अन्न व औषध प्रशासन
Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून अॅक्शन मोडमध्ये असल्याने अन्न व औषध प्रशासन राज्यातील अनेक ठिकाणी छापे टाकत असून भेसळयुक्त अन्नावर कारवाई करताना दिसत आहे. तर आता तुकाराम मुंढे यांनी राज्यातील हॉटेल्स, उपाहारगृहे, खाद्यगृहे आणि सर्व अन्न सेवा आस्थापनांसाठी नवीन आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत असलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा देखील इशारा अन्न व औषधे प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या नवीन आदेशानुसार, राज्यातील सर्व परवानाधारक अन्न व्यवसाय चालकांनी स्वच्छता, अन्न सुरक्षा, परवाना अटी आणि ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. तर प्रत्येक हॉटेल आणि रेस्टॉरंटने परवान्याची प्रत दर्शनी भागात लावणे, परवानाधारक पुरवठादारांकडूनच कच्चा माल खरेदी करणे अन्नाच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी ठेवणे आणि असुरक्षित अथवा निकृष्ट दर्जाचे अन्न विक्रीस ठेवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच अन्न व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या पाण्याची पिण्यायोग्यता सुनिश्चित करणे, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी करणे आणि त्यांना अन्न सुरक्षा व स्वच्छतेचे प्रशिक्षण देणेही अनिवार्य करण्यात आले आहे.
वैभव सूर्यवंशीसह तीन खेळाडू करणार भारतासाठी टी-20 पदार्पण-
तसेच अन्न व औषधेने हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठी स्वच्छतेबाबतही कठोर निकष लागू केले आहेत. स्वयंपाकघर, साठवण व्यवस्था, उपकरणे, भांडी, कचरा व्यवस्थापन, कीटक नियंत्रण, तापमान नियंत्रण आणि अन्न साठवण याबाबत निश्चित मानकांचे पालन करावे लागणार आहे. तसेच मुदतबाह्य अन्नपदार्थ विक्रीस ठेवण्यास बंदी घालण्यात आली असून अन्न उत्पादनांची नियमित प्रयोगशाळा चाचणी करणे, अन्न सुरक्षा नोंदी जतन करणे आणि ग्राहकांना अॅलर्जीकारक घटकांची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील अन्न सेवा क्षेत्रात सुरक्षित, सकस आणि भेसळमुक्त अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी हा आदेश जारी करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध विभागाकडून देण्यात आली आहे.