शिवराजला मानलं पाहिजे, उदयनराजे भोसलेंकडून शिवराजचं तोंडभरुन कौतुक

शिवराजला मानलं पाहिजे, उदयनराजे भोसलेंकडून शिवराजचं तोंडभरुन कौतुक

सातारा : शिवराजला मानलं पाहिजे, त्याने स्वत:च्या शरीरावर खूष कष्ट घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र केसरीचा किताब त्याला मिळाला, या शब्दांत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचं कौतुक केलंय. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा सत्कार केला.

पुढे बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, पुण्यातील महाराष्ट्र केसरी स्पर्धेच नियोजन अत्यंत उत्कृष्ट झालं. कुस्ती ही पूर्वीपासून खेळली जात आहे. मी प्रत्यक्षात टीव्हीवर हा कुस्ती सामना पाहत होतो. शिवराज राक्षेला मनापासून शुभेच्छा. तो तरुण आहे, त्याला भरपूर स्कोप आहे. ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये मोठं राजकारण पाहायला मिळतं. ते थांबलं पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्पोर्ट्समन्सना काहीवेळा नैराश्य येतं. वाटतं की, एवढे सगळे कष्ट केले. माझ्यापेक्षा त्याने कष्ट घेतले नाहीत, तरी त्याला संधी दिली जाते. असं होता कामा नये, असं उदयनराजेंनी म्हंटलं आहे. ऑलिम्पिकला भारताची मोठी टीम जाते. पण मेडल एखादच मिळतं. पण घाना, कॅमरुन या देशातील 10-15 जण जातात आणि तीन-चार मेडल घेऊन येत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.केंद्रासह राज्याने अशा खेळाडूंकडे लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केलीय.

दरम्यान, मागील आठड्यात पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पाडली. फायनलमध्ये शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडचा पराभव केला. महाराष्ट्र केसरी ही प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेकडे राज्यभरातील कुस्तीप्रेमींच लक्ष असतं. त्यामुळे या स्पर्धेसाठी अनेक मल्ल वर्षानुवर्ष कष्ट करीत असतात. खेळामध्ये राजकारण आलं तर खेळाडूला नैराश्य येत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube