‘भ्रष्टाचार करा अन् भाजपात या’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

‘भ्रष्टाचार करा अन् भाजपात या’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

Uddhav Thackeray On BJP: आदर्श घोटाळा केलेल्या अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) भाजपने घेतले. 70 हजार कोटींचा घोटाळा केलेले अजित पवार (Ajit Pawar) आज भाजप सोबत आहेत. आता घोषणा बदला, 50 खोके ‘शिंदे को ठोके’ असे म्हणा. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे सरकार उलटवून टाकायचे आहे आणि रामराज्य आणायचे आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी केला आहे. सोनई येथे ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

‘मी विश्वास देऊ शकतो जो मिंधेंकडे नाही. (CM Eknath Shinde) गद्दारांनी सरकार पाडले नसते तर गडाख मंत्री असते. गडाखांनी निष्ठा दाखवली म्हणून तुमच्या घराण्याला जनता मान देते. चव्हाण असे अचानक जातील एस वाटत नव्हते. काल आमच्यासोबत चर्चा केली जागा वाटपाबत चर्चा झाली एन ते पक्षातून निघून गेले. चव्हाणांवर आरोप करणारे मोदी स्वतः होते. चव्हाण लीडर नाही डिलर आहे असे फडणवीस म्हणाले. हे दोनशे पार नाही साधं चाळीस पार पण जाणार नाही. अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

अशोक चव्हाण घाबरून पळाले. मला नाही अब्रू मी कशाला घाबरू लोक काय म्हणतील, याच काही घेणे देणे नाही. जे घाबरत आहे त्यांनी भेकड पक्षात जावं. चव्हाण यांनी भाजपात जाण्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जायच होत. शेतकऱ्यांचे पंचनामे हे सरकार करू शकत नाही. पिकविमा भरले. मात्र शेतकऱ्यांच्या हातात काही मिळाले नाही. जिथे जाऊ तिथे खाऊ मोठ्यांप्रमाणावर घोटाळा सुरु आहे. असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

“PM मोदींचे काम पाहून इम्प्रेस झालो…” : भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाणांची स्तुतीसुमने

मोदींना असं वाटतं असेल की मोठे नेते फोडले की फायदा होईल, हे तुम्हाल शोभत नाही. मोदी राज्याला देत काही नाही मात्र उद्योगधंदे इथून पळवून लावत आहेत. महाराष्ट्राची लुट करणारे हुकूमशहा हे राज्याला बरबाद करू राहिले. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही मात्र गद्दारांना खोके मिळतायत. गद्दारा भाजपात गेले की त्यांची रेकॉर्ड धुतली जातात. ज्यांनी कष्ट करून पक्ष उभारले एन बाहेरुन आलेले उपरे तुमच्या डोक्यावर येऊन बसले आहे. खासदार लोखंडे यांनी पुन्हा उभा राहून दाखवच भाजपने व भ्रष्ट पक्ष आहे. निळवंडे धरणाचे पराभवाचे पाणी श्रेय घेणार्याना पाजायचे . शेतकऱ्यांमुळे मोदी दिल्लीत पोहचले. मात्र याच शेतकऱ्यांना दिल्लीचा सीमेवर रोखलं जात आहे.

शेतकऱ्यांना काही मागल तर गोळ्या घालू अस हे सरकार आहे. शिवसेनेन भाजपला वीस पंचवीस वर्ष साथ दिली. मात्र ती वर्ष सडली आहे. घरातील चुल पेटवणार असं आपल शिवसेनेचं हिंदुत्व आहे. ‘भ्रष्टाचार करा अन् भाजपात या’ काही होणार नाही मोदी की गॅरेंटी असं सध्या सुरु आहे. सत्तर हजार कोटी भ्रष्टाचार केलं तुला उपमुख्यमंत्री करतो, भ्रस्टाचारांना भ्रष्टाचारांना साथ देणे हे आमचं हिंदुत्व नाही. मोठ्या नेत्यांनी शरणागती स्वीकारली तरी मोडेल पण वाकणार नाही, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज