शेतकऱ्यांसाठी इतिहासातील सर्वात मोठं पॅकेज ही फडणवीसांची इतिहासातील सर्वात मोठी थाप -ठाकरे
पत्रकारांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पक्षाच्या संभाव्य युतीबाबत प्रश्न विचारला, यावर उत्तर देताना ते म्हणाले, आता सुरवात झालेली आहे

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज (11 ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हंबरडा मोर्चा’ काढण्यात आला. सरकारने मदतीची घोषणा केली असली तरी, पंचनामे अद्यापही झाले नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. (Thackeray) या पत्रकार परिषदेत त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न विचारण्यात आला यावेळी त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना मनसे पक्षासोबत युतीबाबत मोठे विधान केले आहे.
पत्रकारांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पक्षाच्या संभाव्य युतीबाबत प्रश्न विचारला, यावर उत्तर देताना ते म्हणाले, आता सुरवात झालेली आहे, या मोर्चाचे नाव जरी हंबरडा मोर्चा असेल तरी याला मी इशारा मोर्चा म्हणेन अस ते म्हणाले. शेतकरी जर आक्रोश करत आहे, आणि हा आक्रोश सरकारच्या कानावर पडून देखील सरकारचे काम बंद पडत असतील, तर ते काम उघडण्याचे काम आम्ही नक्की करू. महाराष्ट्रातील प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी आम्ही दोघे जरुर एकत्र येऊन काम करेन, अस विधान त्यांनी केले आहे.
फडणवीस सरकारला वठणीवर आणणारच! हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश
आहे. आजपर्यंत कोणी अशी थाप मारली नव्हती. इतिहासातील पहिली मोठी थाप फडणवीस सरकारने केली, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, कळवळा आला असता तर नरेंद्र मोदी नुकतेच महाराष्ट्रात येऊन गेले. त्यांटी दोन-तीन भाषणे झाली, पण त्यात शेतकऱ्यांबद्दल उल्लेख नव्हता.
ज्या पंतप्रधानांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती माहीत नाही. त्यांच्याकडे काय न्याय मागायचा? असा प्रश्न उपस्थित करताना उद्धव ठाकरे यांनी सत्तेत एक फूल आणि दोन हाफ बसले आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. तसेच, केंद्राचे पथक आले का? अस कोणाच्या पाहणीत आले का केंद्राचे पथक आले आहे? या भागात जाऊन पाहणी केली, या गावातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या? असा प्रश्नही यावेळी त्यांनी अपस्थित केला.