हिंदी सक्ती नाही म्हणजे नाही! आंदोलनाला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा, उद्धव ठाकरेंनी केलं आवाहन

हिंदी सक्ती नाही म्हणजे नाही! आंदोलनाला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा, उद्धव ठाकरेंनी केलं आवाहन

Uddhav Thackeray Support Marathi Language Protest Against Hindi : महाराष्ट्रात सर्वच स्तरातून हिंदी सक्तीच्या निर्णयाला (Hindi Language Compulsion) विरोध होत आहे. या विषयावर मराठी अभ्यास केंद्राच्या आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी पाठींबा दिला आहे. आझाद मैदानात 7 जुलै रोजी हे आंदोलन होणार आहे. यामध्ये सर्व मराठी कलाकार, खेळाडू, साहित्यिक यांनी सहभागी व्हावं, असं आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलंय.

…त्यांचा छुपा अजेंडा

माध्ममांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की, आम्ही कोणत्या भाषेचा द्वेष करत नाही. आंदोलनाला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं ठाकरे यांनी दीपक पवार यांना आश्वासन दिलंय. दोन दिवसांत हा विषय संपणारा (Hindi Marathi Dispute) नाही. बाटेंगे आणि काटेंगे असं भाजपचं धोरण दिसतंय. हे चांगलं सगळं चाललं असताना विषाचा खडा टाकत आहे. हिंदी सक्तीची यामागे त्यांचा छुपा अजेंडा आहे. एकाधिकारशाहीकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. ही भाषिक आणीबाणी आहे, त्याचा विरोध आम्ही करत आहोत.

Video : राज ठाकरेंनी हिंदी सक्तीविरोधात दंड थोपटले; 6 जुलैचा मुहूर्त निवडत सरकारला दाखवणार ताकद

हिंदी सक्तीची करू देणार नाही…

आपल्या देशाची भाषावार प्रांत रचना झालेली आहे. मराठी भाषा व्यवहारात आली पाहिजे. मुख्यमंत्री असताना मराठी भाषा मी सक्तीची केली होती, त्याचं काय झालं? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी केलाय. आमच्या लहान मुलांवर हिंदी सक्तीची करू देणार नाही. नाही म्हणजे नाही. भाजपचं धोरण मराठी भाषिक हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. यावेळी त्यांनी सर्व मराठी बांधवांना या आवाहनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय.

Sajana Movie Premiere: हॉटेल भाग्यश्री सुरू करणार खास कपल्स स्पेशल “सजना थाळी”!

केवळ हिंदीसाठी जबरदस्ती का?

त्रिभाषा सुत्रचं मान्य नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. एवढ्या सगळ्या देशात भाषा असताना त्रिसुत्रीच का, वीससुत्री काढा असं त्यांनी म्हटलंय. केवळ हिंदीसाठी जबरदस्ती का, असं देखील त्यांनी विचारलं. क्रेडिट स्कोअर वाढला तरी नोकऱ्या कुठेत? असंही त्यांनी विचारलं आहे. तर आझाद मैदानात 7 जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देत यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलंय. उगाच भाकडकथा सांगू नका, असंही त्यांनी म्हटलंय. आता पावसाळी अधिवेशन तोंडावर आहे. असे विषय काढून अधिवेशन व्यवस्थित पार पाडायचं. त्यांचे घोटाळे समोर येणार नाही, असा त्यांचा उद्देश असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube