धुळ्यात बिबट्याचा धुडगूस; सुधीर मुनगंटीवारांनी दिले मारण्याचे आदेश

धुळ्यात बिबट्याचा धुडगूस; सुधीर मुनगंटीवारांनी दिले मारण्याचे आदेश

Sudhir Mungantiwar : धुळे जिल्ह्यातील बोरी पट्ट्यात नरभक्षक बिबट्याने धुडगूस घातल्याने बिबट्याला मारण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिले आहेत. या नरभक्षक बिबट्याने आत्तापर्यंत 2 बालकांचा बळी घेतला असून एका बालकाला गंभीर जखमी केलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनंतर अखेर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बिबट्याला मारण्याचे आदेश दिले आहे.

‘बाबा महाराज सातारकर देशाचे अनमोल रत्न होते’ : भाषणाच्या सुरुवातीलाच PM मोदींकडून आदरांजली

धुळे जिल्ह्यातीला काही भागांत बिबट्यांचा संचार सुरु असतो. अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात गायी, बैल, शेळ्यांचा बळी गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे. याचं पार्श्वभूमीवरआता बोरी पट्ट्यातील तीन बालकांवर बिबट्याने हल्ला केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

London Misal: मनोरंजनाची झणझणीत मेजवानी; ‘लंडन मिसळ’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

नरभक्षक बिबट्याकडून तीन बालकांवर हल्ला झाल्यानंतर तत्काळ आमदार कुणाल पाटील यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. या भेटीत कुणाल पाटील यांनी मुनगंटीवारांकडे बिबट्याला मारण्याचे आदेश देण्याची मागणी केली.

सरकारी भाषा अन् आश्वासनांचा पाऊस : महाजनांसोबतचा संवाद जरांगे पाटलांनी महाराष्ट्राला ऐकवला

परिस्थितीची दखल घेत सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता यांना फोन करुन बिबट्याला मारण्याचे आदेश दिले आहेत.

Pankaja Munde : ..अन् अचानक पंकजा मुंडेंचा माईक पडला बंद; सभेत नेमकं काय घडलं?

दरम्यान, राज्याचे मुख्य वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक महिप गुप्ता यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्याचे आणि तसे शक्य झाले नाही तर ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपये आणि जखमींवर शासकीय खर्चाने उपचार व नुकसान भरपाई तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube