नाची, डान्सर, बबलीशी ही लढाई नाही; नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले…

नाची, डान्सर, बबलीशी ही लढाई नाही; नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले…

Sanjay Raut On Navneet Rana : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण तापलं आहे. जाहीर सभांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल चढवला जात आहे. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर सडकून टीका केली आहे. ही लढाई देशाची आहे, बळवंत वानखेडे आणि नाची, डान्सर बबलीविरोधातली नाही, अशी सडकून टीका केली आहे.

मी सुनेत्रा अन् पार्थ पवारांची कर्जदार, शेतीतूनही शून्य उत्पन्न; सुप्रिया सुळेंनी सादर केलं शपथपत्र

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांची नाची, डान्सर, बबलीविरोधात लढाई नाही. तर ही लढाई मोदीविरुद्ध महाराष्ट्र, मोदी विरुद्ध शरद पवार, मोदीविरुद्ध राहुल गांधी, मोदीविरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात असल्याचीही टीका संजय राऊतांनी केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात आज राजकीय धुराळा; शक्तीप्रदर्शन अन् दिग्गजांच्या हजेरीत उमेदवार भरणार अर्ज

तसेच ज्या बाईने मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या बाईने मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला. मातोश्रीविषयी, हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले आहेत, त्या बाईचा पराभव करणे शिवसैनिकाचं कर्तव्य आहे. तिच्या पराभवात शिवसेनेचं मोठं योगदान असलं पाहिजे, हा बाळासाहेबांचा आदेश आहे, असं समजा आणि कामाला लागा, असं संजय राऊत यांनी जाहीर सभेत स्पष्ट केलं आहे.

‘मैदान’कडून प्रेक्षकांची निराशा; ‘BMCM’ला अधिक पसंती, वाचा पहिल्या आठवड्यात किती झाली कमाई

दरम्यान, अमरावतीत आज महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली. या सभेला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यासह काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज