अमरावतीत महायुतीचं गणित बिघडलं? ‘आम्ही लाज सोडलेली नाही’, अडसूळ आक्रमक

अमरावतीत महायुतीचं गणित बिघडलं? ‘आम्ही लाज सोडलेली नाही’, अडसूळ आक्रमक

Amravati Loksabha : मागील अनेक दिवसांपासून अमरावती लोकसभा (Amravati Loksabha) मतदारसंघातून भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. अखेर उमेदवारीला विरोध करणाऱ्यांच्या नाकावर टिचून विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी भाजपचं तिकीट खेचूनच आणलं आहे. नवनीत राणांना तिकीट मिळताच स्थानिक नेत्यांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात येत आहे. आम्ही लाज शरम सोडलेली नाही, नवनीत राणांविरोधात (Navneet Rana) निवडणुकीत उभं ठाकणार असल्याचा निर्धार शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला आहे. त्यामुळे आता अमरावतीत महायुतीत फुट पडणार असल्याचं बोललं जात आहे.

रणजितसिंह निंबाळकरांचा एककलमी कार्यक्रम; माढ्याचा उमेदवार बदला, कार्यकर्त्यांच्या हट्टानं अजितदादा पेचात

आनंदराव अडसूळ म्हणाले, भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली ही राजकीय हत्या असून महायुद्धात जपानने हाराकिरी केली तेच भाजपकडून करण्यात आलं आहे. अमरावती मतदारसंघातील सर्व स्थानिक नेते विरोधात असतानाही भाजपने कशाच्या जीवावर नवनीत राणांना उमेदवारी दिली असल्याचा रोखठोक सवाल आनंदराव अडसूळ यांनी केला आहे.

नवनीत राणा उमेदवारी जाहीर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांसाठी महायुतीतील सर्वच नेते माझा प्रचार करणार असल्याचं नवनीत राणांनी जाहीर केलं आहे. या दाव्यावर बोलताना अडसूळ म्हणाले, नवनीत राणा निर्लज्ज आहे, काहीही बोलतात, आम्ही लाज शरम सोडली नाही, स्वाभिमान विकलेला नाही, आहे तिथेच आहे आम्ही, आम्ही आमच्या जीवावर निवडणूक लढणार असून मी स्वत: अमरावतीतून निवडणुकीत उतरणार असल्याचं अडसूळ यांनी सांगितलं आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपला कमळ चिन्हावर निवडणूक लढणारी व्यक्ती हवी होती, त्याला मी काय करणार? मला जर ऑफर आली तर मी भाजपमध्ये जाणार असल्याचंही अडसूळ यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, नवनीत राणा यांची उमेदवारी ही महायुतीकडून जाहीर करण्यात आलेली नाही. भाजपकडून राणा यांना उमेदवारी देण्याती आलीयं. मी शिंदे गटाचा उमेदवार म्हणून निवडणुकीत उभं राहणार असल्याचं अडसूळ यांनी सांगितलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज